गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी मुस्लिम आहे म्हणून…”, दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतबरोबरच्या नात्यावर आदिल खानचं भाष्य, म्हणाला, “लग्न केलं पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adil Khan Durrani On Rakhi Sawant

“मी मुस्लिम आहे म्हणून…”, दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतबरोबरच्या नात्यावर आदिल खानचं भाष्य, म्हणाला, "लग्न केलं पण..."

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती पती आदिल खाल दुर्रानी त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. ३ मार्च रोजी त्याने सोमी खानसह लग्न केले. याबाबतची अधिकृत माहिती त्याने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन दिली. आदिलने गुपचूप लग्न केले कारण त्याला कोणत्याही प्रकारची नकारात्मकता त्याच्या भोवती नको होती. लग्नानंतर आदिल व सोमी खानबरोबर खुश असल्याचे दिसत आहे. राखीबरोबरच्या लग्नाबाबत आदिलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Adil Khan Durrani On Rakhi Sawant)

आदिल खान दुर्रानी व त्याची पत्नी सोमी खान यांनी अलीकडेच ‘इटाइम्स टीव्ही’शी संवाद साधला आणि त्यांच्या लग्नाव्यतिरिक्त राखी सावंतबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. यावेळी बोलताना आदिलने राखी सावंतवर नकारात्मकता पसरवल्याचा आरोपही केला. आदिलने सांगितले की, “माझ्याबरोबर असूनही राखी आधीच विवाहित होती, यासंदर्भात खटला सुरु आहे”.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘या’ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीमध्ये होणार भरपूर फायदा, तर ‘या’ राशीला धनलाभ मिळणार, तुमच्या नशिबाामध्ये काय बदल होणार?

View this post on Instagram

A post shared by SOMI KHAN (@somikhan_ks)

आदिल म्हणाला, “जर तुम्ही माझ्या आणि राखी सावंतच्या लग्नाबद्दल बोललात तर ते पूर्णपणे अमान्य आहे कारण जेव्हा आम्ही लग्न केले तेव्हा ती आधीच विवाहित होती. तिने दुसऱ्याशी लग्न केले होते. मला फसवून तिने हे कृत्य केले. याबाबत न्यायालयात खटला सुरु आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न होता की मी दुसरे लग्न कसे केले? मला पुनर्विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण मी मुस्लिम आहे आणि लग्न करु शकतो. घरच्यांच्या उपस्थितीत माझे लग्न व्यवस्थित पार पडले. मी गुपचूप लग्न केले नाही. सोमी आणि माझ्या कुटुंबीयांच्या मान्यतेने मी या नात्याला योग्य तो न्याय दिला आहे. मी रिसेप्शन पण केले आहे. सोमीशी अधिकृतपणे लग्न केल्यानंतर मी माझी पत्नी सोमीबरोबर फिरत आहे. मला लग्न करण्याची परवानगी आहे”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता….’ फेम टप्पू-बबिताच्या साखरपुड्याबद्दल स्वतः अभिनेत्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “त्या बातम्या…”

आदिलने सांगितले की, “कोणत्याही प्रकारची नकारात्मकता टाळण्यासाठी त्याने लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही. आम्ही ठरवले होते की, जोपर्यंत लग्न होत नाही, तोपर्यंत कोणतीच घोषणा करणार नाही. खूप नकारात्मकता होती. त्यामुळे लग्नात कोणताही अडथळा येऊ नये असे आम्हाला वाटत होते. मला सोमीबद्दल थोडीशीही नकारात्मकता आणायची नव्हती”. राखी सावंतबद्दल आदिल म्हणाला की, “ती नकारात्मकता पसरवत आहे आणि ती आयुष्यात कोणालाही आनंद देऊ शकत नाही. मला तिच्याबद्दल सर्व माहिती आहे. ती जे काही बोलत आहे, ते करत आहे. तिने माझ्याबरोबर खूप वाईट गोष्टी केल्या आहेत आणि आता मी चांगले आयुष्य जगत आहे. मला माहित नव्हते की वाईट भूतकाळानंतर, मला इतक्या लवकर इतका चांगला जोडीदार मिळेल”, असंही तो म्हणाला.

Tags: Adil Khan DurraniAdil Khan Durrani On Rakhi Sawantbollywood gossipentertainmentrakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Siddharth Jadhav Angry

Video : विमान प्रवासा दरम्यान झालेल्या गैरसोयीवर भडकला सिद्धार्थ जाधव, राग व्यक्त करत म्हणाला, "माझ्या बॅगेचं हँडल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.