‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोडीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत केस दाखल केली होती. असित मोदी यांच्याकडे पैसे थकल्याचेही तिने यावेळी सांगितले. या प्रकरणात जेनिफर मिस्त्रीला विजय मिळाला. असित मोदी यांना जेनिफर मिस्त्रीची थकबाकीची रक्कम परत करण्याचे आणि ५ लाखांचा दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने सुनावले आहेत. पण निकाल आपल्या बाजूने लागूनही जेनिफर मिस्त्री खूश दिसत नाही आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या एका वर्षात तिने किती त्रास सहन केला आणि काय सहन केले. (Jennifer Mistry statement)
जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तिची मैत्रिण सोनालिका जोशी, अंबिका रांजणकर आणि मंदार चांदवडकर यांच्याबरोबरचे सर्व संबंध संपल्याचाही खुलासा केला आहे. जेनिफर मिस्त्रीची अवस्था अशी झाली की, तिने १०० वेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला. जेनिफरने ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करताना २०२२ मध्ये ‘दैनिक भास्कर’ला सांगितले होते की, ते तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवत असे आणि तिच्या ओठांची प्रशंसा करत असे. अनेकदा ते अभिनेत्रीला फोन करून खोलीत बोलावत असे.
‘ईटाईम्स’शी बोलताना जेनिफर मिस्त्री म्हणाली, “मला नेहमी वाटत होतं की मी माझ्या मित्रांशिवाय जगू शकणार नाही. मी माझ्या सहकलाकारांपासून, विशेषतः तीन-चार मित्रांपासून दूर राहू शकत नाही. त्याच्याशी बोलल्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. एक दिवसही त्याच्याशी बोलल्याशिवाय जगण्याची कल्पनाही मला करवत नाही. विशेषतः सोनारिका, अंबिका आणि मंदार, माझे मेकअप दादा. पण या सर्व लोकांनी माझ्याशी संबंध तोडले”.
जेनिफर पुढे म्हणाली, “जेव्हा माझ्या प्रकरणाची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनी माझा फोन उचलणे बंद केले. माझ्या वाढदिवशीही मला कोणीही शुभेच्छा दिल्या नाहीत. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. ते फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा असंही म्हणू शकले असते. मी त्यांना या प्रकरणात ओढत नाही. माझ्या नातेवाईकांपेक्षा मी जास्तवेळ सेटवर घालवला”. मंदार, सोनालिका आणि अंबिका यांच्या बरोबरच्या मैत्रीची आठवण करून देताना जेनिफर म्हणाली, “मी मंदार, सोनालिका आणि अंबिका यांच्याबरोबर १५ वर्षे काम केले आहे. मी प्रेग्नेंसीसाठी ब्रेकवर असतानाही ते माझ्या संपर्कात होते. पण जेव्हा केस समोर आली तेव्हा त्यांनी हळूहळू सर्व संबंध तोडायला सुरुवात केली. ते माझ्यासाठी दुसरे कुटुंब होते. त्यांच्या मुलांमध्ये माझाही सहभाग होता”.