गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय अन् हार्दिक पांड्यावर रागावलेले प्रेक्षक शांत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबाबत स्वतःच म्हणाला, “या सामन्यात प्रेक्षकांकडून…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 8, 2024 | 11:12 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Mumbai Indians vs Delhi Capitals

Mumbai Indians vs Delhi Capitals

आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी मानला जाणारा संघ म्हणजे ‘मुंबई इंडियन्स. पहिले काही सामने सलग पराभव स्वीकारल्या नंतरही फायनल पर्यंत मजल मारण्याची कामगिरी मुंबईने अनेकदा केली आहे. मुंबईला यंदाचा हंगाम ही काहीसा असाच सुरु झालेला पाहायला मिळाला. पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर अखेर चौथ्या सामन्यात मुंबईला विजय प्राप्त झाला. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात दिल्लीचं पारडं मुंबईपुढे झुकलेलं दिसलं. (Mumbai Indians vs Delhi Capitals)

रोहित शर्मा, ईशान किशन, टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड यांच्या दमदार खेळीमुळे मुंबईने २३४ धावांचा विशाल डोंगर दिल्ली समोर उभा केला. महाकाय धावांचा पाठलाग करत असताना दिल्लीला देखील चांगलाच जोर लावावा लागला. मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने २ तर विदेशी खेळाडू गिर्लाड कॉटझी ने दिल्लीच्या ४ फलंदाजांना बाहेर काढण्यात यश मिळवले. मुंबईच्या प्रभावी माऱ्यामुळे २०५ धावांवर दिल्ली कॅपिटल्सला समाधान मानावे लागले आणि या हंगामातील आपल्या चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला.

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

आणखी वाचा- “तारक मेहता…” मधील ‘या’ कलाकारांनी तोडले जेनिफर मिस्त्रीबरोबरचे संबंध, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “माझे फोन घेणे…”

सामन्यानंतर विजयी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपली बाजू मांडताना समाधान व्यक्त केले. हार्दिक पांड्या म्हणाला “आम्हाला कोणत्याही परिस्थतीमध्ये हा विजय मिळवायचा होता. त्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनतदेखील घेतली. सुरुवातीला आमची फलंदाजी चांगली झाली नंतर एकत्र काही गाडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव होता पण रोमारिओ शेफर्ड व टीम डेव्हिड यांच्या दमदार खेळीच्या जोरावर आम्ही २३४ धावांपर्यंत पोहचू शकलो. आम्ही आता पुन्हा विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. यासाठी आम्ही पुन्हा नव्याने संघबांधणी केली आणि त्याचा फरक आम्हाला या सामन्यात पाहायला मिळाला. शिवाय या सामन्यात प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या विजयाचा आनंद द्विगुणित झाला. (Mumbai Indians vs Delhi Capitals)

आणखी वाचा- “आम्हाला पुढे येऊ देत नाहीत आणि…”, आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे कंगना रणौत भडकली, म्हणाली, “बॉलिवूडमधले सगळेच जण…”

मुंबई व दिल्ली या संघातील हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. मागील काही सामन्यांमध्ये प्रत्येक स्टेडियमवर हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याचं दिसलं होतं. या सामन्यात मात्र असा कोणताही प्रकार निदर्शनास आला नाही. मुंबईच्या पहिल्या विजयानंतर हार्दिकला छंत्यांचं प्रेम पुन्हा मिळणार का? येणाऱ्या सामन्यांमध्ये मुंबई विजय मिळवण्यात यशश्वी होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. मुंबईचा आगामी सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर असून रोहित शर्मा व महेंद्र सिंग धोनी हे दोन दिग्गज खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. या दोघांमधील लढत पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक दिसत आहेत.

Tags: Hardik Pandyamumbai indiansmumbai indians vs delhi capitalsrohit sharma
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
Next Post
Shruti Marathe shared a video of her husband Gaurav Ghatnekar singing Gulabi Saree song wrongly

Video : "गुलाबी लाली आणि गाल लाल लाल…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या नवऱ्याचं 'गुलाबी साडी'वरुन भन्नाट गाणं, हसू आवरेना, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.