शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’च्या निर्मात्याकडून लैंगिक शोषण झाल्यानंतर सहकलाकारांनीही बोलणं टाकलं, जेनिफर मिस्त्रीचा आरोप, म्हणाली, “चांगले मित्र असूनही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 8, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jennifer Mistry statement

'तारक मेहता...'च्या निर्मात्याकडून लैंगिक शोषण झाल्यानंतर सहकलाकारांनीही बोलणं टाकलं, जेनिफर मिस्त्रीचा आरोप, म्हणाली, "चांगले मित्र असूनही..."

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोडीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत केस दाखल केली होती. असित मोदी यांच्याकडे पैसे थकल्याचेही तिने यावेळी सांगितले. या प्रकरणात जेनिफर मिस्त्रीला विजय मिळाला. असित मोदी यांना जेनिफर मिस्त्रीची थकबाकीची रक्कम परत करण्याचे आणि ५ लाखांचा दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने सुनावले आहेत. पण निकाल आपल्या बाजूने लागूनही जेनिफर मिस्त्री खूश दिसत नाही आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या एका वर्षात तिने किती त्रास सहन केला आणि काय सहन केले. (Jennifer Mistry statement)

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तिची मैत्रिण सोनालिका जोशी, अंबिका रांजणकर आणि मंदार चांदवडकर यांच्याबरोबरचे सर्व संबंध संपल्याचाही खुलासा केला आहे. जेनिफर मिस्त्रीची अवस्था अशी झाली की, तिने १०० वेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला. जेनिफरने ‘तारक मेहता’चे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करताना २०२२ मध्ये ‘दैनिक भास्कर’ला सांगितले होते की, ते तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवत असे आणि तिच्या ओठांची प्रशंसा करत असे. अनेकदा ते अभिनेत्रीला फोन करून खोलीत बोलावत असे.

आणखी वाचा – ‘झी नाट्य गौरव २०२४’ सोहळ्यात या नाटकाने पटकावले अनेक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं…; वाचा संपूर्ण यादी

‘ईटाईम्स’शी बोलताना जेनिफर मिस्त्री म्हणाली, “मला नेहमी वाटत होतं की मी माझ्या मित्रांशिवाय जगू शकणार नाही. मी माझ्या सहकलाकारांपासून, विशेषतः तीन-चार मित्रांपासून दूर राहू शकत नाही. त्याच्याशी बोलल्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. एक दिवसही त्याच्याशी बोलल्याशिवाय जगण्याची कल्पनाही मला करवत नाही. विशेषतः सोनारिका, अंबिका आणि मंदार, माझे मेकअप दादा. पण या सर्व लोकांनी माझ्याशी संबंध तोडले”.

आणखी वाचा – अर्जुनच्या प्रेमात सायली बेधुंद, देणार का एकमेकांना प्रेमाची कबुली?, मालिकेत पुढे काय घडणार?

जेनिफर पुढे म्हणाली, “जेव्हा माझ्या प्रकरणाची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनी माझा फोन उचलणे बंद केले. माझ्या वाढदिवशीही मला कोणीही शुभेच्छा दिल्या नाहीत. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. ते फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा असंही म्हणू शकले असते. मी त्यांना या प्रकरणात ओढत नाही. माझ्या नातेवाईकांपेक्षा मी जास्तवेळ सेटवर घालवला”. मंदार, सोनालिका आणि अंबिका यांच्या बरोबरच्या मैत्रीची आठवण करून देताना जेनिफर म्हणाली, “मी मंदार, सोनालिका आणि अंबिका यांच्याबरोबर १५ वर्षे काम केले आहे. मी प्रेग्नेंसीसाठी ब्रेकवर असतानाही ते माझ्या संपर्कात होते. पण जेव्हा केस समोर आली तेव्हा त्यांनी हळूहळू सर्व संबंध तोडायला सुरुवात केली. ते माझ्यासाठी दुसरे कुटुंब होते. त्यांच्या मुलांमध्ये माझाही सहभाग होता”.

Tags: entertainmentJennifer mistryJennifer Mistry statementTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Mumbai Indians vs Delhi Capitals

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय अन् हार्दिक पांड्यावर रागावलेले प्रेक्षक शांत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबाबत स्वतःच म्हणाला, "या सामन्यात प्रेक्षकांकडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.