शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आजारपणानंतर गुरुचरण सिंह पुन्हा ‘तारक मेहता…’मध्ये परतणार, निर्मात्यांकडे काम मागत म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2025 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gurucharan Singh now wants to start working

गुरुचरण सिंह पुन्हा 'तारक मेहता…'मध्ये परतणार, 'तारक मेहता'च्या निर्मात्याशी साधला संवाद

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह यांनीही या शोमधून वर्षानुवर्षे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. मात्र नंतर तो शोमधून अचानक गायब झाला. अभिनेता काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.  अभिनेत्याने स्वत: हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर करत त्याची अवस्था दाखवली होती. मात्र यानंतर अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याच्या वडिलांनी आरोग्याची माहिती दिली की अभिनेत्याने खाणे-पिणे सुरु केले आहे आणि तो हळूहळू त्याच्या दैनंदिन दिनचर्येत परत येत आहे. (Gurucharan Singh now wants to start working)

गुरुचरण सिंहला आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची आहे. त्याला इंडस्ट्रीत परतायचे आहे आणि त्यासाठी त्याने ‘तारक मेहता’च्या निर्मात्याशी संवाद साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंहने त्याच्या आरोग्याबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माते असित मोदी यांना या निर्मिती संस्थेत काम करण्यास सांगितले होते. गुरुचरण सिंह त्याच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे नाराज आहे. 

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

आणखी वाचा – “माझा किंवा माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात”, X वरील बनावट पोस्ट पाहून सोनू निगम संतापला, म्हणाला, “प्रशासन, सरकार शांत आहेत आणि…”

याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘खरं तर, मला सर्वांना गुरुपर्वाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्या दिवशी मला गुरुद्वारात जायचे होते, पण माझी तब्येत बिघडली आणि मला रुग्णालयात दाखल करावे लागले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टरांनी मला ग्लुकोज दिला. त्यावेळी मला वाटले की, मी माझ्या सर्व प्रियजनांना शुभेच्छा द्याव्यात. मी ते केले आणि माझा व्हिडीओ व्हायरल झाला. मला या संपूर्ण गोंधळाची माहिती नव्हती. मी सगळं मनापासून करतो, पण लोक ते चुकीच्या अर्थाने घेतात”.

आणखी वाचा – “मी मॅरेज मटेरियल नाही”, ‘छावा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाला, “माझं आयुष्य…”

यानंतर गुरुचरणने असं सांगितलं की, “मी असित भाईंना प्रॉडक्शनमध्ये काही काम देण्यास सांगितले होते. मी कलाकारांकडे जाऊ शकतो आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी बोलू शकतो. एक कलाकार म्हणून मी ते उत्तमपणे हाताळू शकतो. मला माहित आहे की, मी काय करेन?, समस्या काय आहे? जेणेकरून मी ती अशा प्रकारे हाताळू शकेन की कलाकार शो सोडणार नाही”.

Tags: Gurucharan Singh now wants to start workingTaarak Mehta Ka Ooltah ChashmahTaarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gurucharan Singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Hemant Dhome angry on Rahul Solapurkar

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन पळाले म्हणणाऱ्यावर भडकला हेमंत ढोमे, म्हणाला, "रोज उठून नवा इतिहास सांगणारे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.