बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सोनू निगमला नुकतीच मोठी दुखापत झाली असून या दुखापतीबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती दिली होती. या गंभीर दुखापतीनंतर त्याने राष्ट्रपती भवनात गाण्याचे सादरीकरण केलं. सोमवारी राष्ट्रपती भवनातील नव्याने बांधलेल्या ओपन एअर थिएटरमध्ये सोनू निगमने सादरीकरण केले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर स्वत:गायकाने शेअर केले आहेत. सोनू निगमने इंस्टाग्रामवर त्यांची नवीनतम पोस्ट शेअर करताना राष्ट्रपतींचे आभार मानलेच नाहीत तर आजचा दिवस अभिमानाचा असल्याचेही म्हटले आहे. या गायकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली. (Sonu Nigam informed his fake twiiter account)
सोनू निगम सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक गाण्याचे व सादरीकरणाचे व्हिडीओ शेअर करत असतो. सोनू निगमचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. मात्र ट्विटरवर नाही आणि याचाच फायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्याबद्दलची चुकीची माहिती शेअर केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ होताना दिसत आहे. सोनू निगम सिंग या नावाच्या व्यक्तीने सोनू निगमसंबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सोनू निगमचा राष्ट्रपतींसोबतचा फोटो अशा पद्धतीने पोस्ट केला आहे की कोणीही गोंधळून जाईल. सोनू निगमने संताप व्यक्त केला आहे की, या व्यक्तीची ही आक्षेपार्ह पोस्ट त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धोक्यात आणू शकते.
याबद्दल त्याने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “मी ट्विटर किंवा एक्सवर नाही. तुम्ही या सोनू निगम सिंगच्या एका वादग्रस्त पोस्टची कल्पना करू शकता, ज्यामुळे माझा किंवा माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकतो? हा माणूस माझ्या नावाशी आणि विश्वासार्हतेशी कितपत खेळत आहे, याची कल्पना करु शकताका? आमचा काहीही दोष नाही. आणि प्रेस, प्रशासन, सरकार, कायदा, ज्यांना याबद्दल माहिती आहे, ते सर्व शांत आहेत. काहीतरी घडण्याची वाट पाहत आहे आणि मग मी तुम्हाला सांत्वन देईन. धन्यवाद”.
आणखी वाचा – Video : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, व्हिडीओ व्हायरल
सोनू निगमच्या या पोस्टवर चाहते त्याला पाठिंबा देताना दिसले. एका वापरकर्त्याने लिहिले, “यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. विशेषतः त्याला अनेक वेळा इशारा देण्यात आला आहे हे लक्षात घेता. तुम्ही अधिकृत तक्रार दाखल करावी. तू त्याला अनेक वेळा इशारा दिला आहेस.” दुसऱ्याने लिहिले: लॉकडाऊनपासून तो तुमचे नाव वापरत आहे. बरीच तक्रार केल्यानंतर, त्याने त्याचे वापरकर्तानाव बदलून सिंग केले परंतु वादग्रस्त गोष्टी पोस्ट करणे थांबवले नाही. लोकांना वाटतं की तुम्ही हे पोस्ट करत आहात”.