शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता….’ फेम टप्पू-बबिताच्या साखरपुड्याबद्दल स्वतः अभिनेत्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “त्या बातम्या…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 14, 2024 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame Raj Anadkat shared a post saying that the rumors of his engagement with munmun Dutta are false

'तारक मेहता....' फेम टप्पू-बबिताच्या साखरपुड्याबद्दल स्वतः अभिनेत्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “त्या बातम्या...”

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका जितकी सर्वांच्या आवडीची आहे, तितकीच या मालिकेतील पात्रदेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. जेठालाल, दया, बापूजी, भिडे यांसह सोसायटीतील इतर अनेक पात्रांनी चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. यात टप्पू सेनाही मागे नाही. मालिकेसह वैयक्तिक आयुष्यामुळेसुद्धा ही पात्र कायमच लक्षात राहिली आहेत. अशातच काल (१३ फेब्रुवारी) रोजी टप्पू व बबिता अर्थात अभिनेता राज अनाडकट व मुनमुन दत्ता यांच्या साखरपुड्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची व या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर टप्पू व बबिता यांच्या साखरपुड्याचा वृत्ताने अक्षरशः धुमाकूळच घातला. सोशल मीडियासह अनेक माध्यमांमध्ये राज अनादकट  व मुनमुन दत्ता यांची नावे ट्रेंडिंगला होती. त्यामुळे सोशल मीडियावर एकीकडे चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात होता, तर दुसरीकडे या दोघांवर अनेक मिम्स व पोस्टद्वारे टीका तसेच ट्रोलिंग केले जात होते. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे आता समोर आले आहे.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘या’ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीमध्ये होणार भरपूर फायदा, तर ‘या’ राशीला धनलाभ मिळणार, तुमच्या नशिबाामध्ये काय बदल होणार?

राजच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच्या टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले की, “सर्वांना नमस्कार, सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सांगत आहोत की, तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत”. साखरपुड्याच्या बातमीची सगळीकडेच चर्चा होत असताना, राजची या पोस्टमधून बरंच काही निष्पन्न झाले आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर असं आयुष्य जगत आहे मुग्धा वैशंपायन, कोकणात सासरच्या घरी करत आहेत लाड, घरचं जेवण पाहून म्हणाली, “खूप दिवसांनी…”

राजकडून या सर्व प्रकरणावर मौन सोडण्यात आले असून या विषयाला आता पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे टप्पू व बबिता यांच्या साखरपुड्याचा बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुनमुन दत्ता व राज अनादकट यांनी काही दिवसांआधी गुजरात येथील वडोदरामध्ये साखरपुडा उरकल्याचं वृत्तदेखील समोर आलं होतं. अशातच आता पुन्हा त्यांच्या साखरपुड्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. मात्र या फक्त अफवाच असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Tags: bollywood actorbollywood actressentertainment newsMunmun duttaraj anadkatTaarak Mehta ka ooltah chashmaTappu and Babita engagement NewsTarak Mehta Ka Ulta Chashma Fame BabitaTarak Mehta Ka Ulta Chashma Fame TappuTv actortv actressटप्पू व बाबिता साखरपुडा बातमीटीव्ही अभिनेताटीव्ही अभिनेत्रीतारक मेहता का उलटा चष्मातारक मेहता का उलटा चष्मा फेम टप्पूतारक मेहता का उलटा चष्मा फेम बाबिताबॉलिवूड अभिनेतामबॉलिवूड अभिनेत्रीमनोरंजन बातमीमूनमून दत्ताराज अनादकट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Adil Khan Durrani On Rakhi Sawant

“मी मुस्लिम आहे म्हणून…”, दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतबरोबरच्या नात्यावर आदिल खानचं भाष्य, म्हणाला, "लग्न केलं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.