‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेने दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सगळ्यांच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. जेठालाल, दयाबेन, बाबूजी, तारक मेहता अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण काही कालावधीपासून एक नाव सतत चर्चेत आहे. या मालिकेमधील सोढी ही भूमिका अधिक लक्षात राहण्यासारखी आहे. ही भूमिका अभिनेता गुरुचरण सिंहने साकारली होती. मात्र वर्षाच्या सुरुवातीला गुरुचरण हे बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मात्र काही दिवसांतच तो घरी परतला अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. (asit modi on gurucharan singh)
सध्या गुरुचरण हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो लवकरच ‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये पुन्हा एकदा दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र एका अहवालानुसार असे नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुचरण यांनी असित मोदी यांना कार्यक्रमात पुन्हा येण्यासाठी खूप आग्रह केला. तसेच नवीन रोशन सोढी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचेही अभिनेत्याने सांगितले. मात्र यावर असित यांनी स्वतः यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.
गुरुचरण यांनी १६ जुलै जुलै रोजी मुंबईतील ऑफिसमध्ये भेट घेतली. त्यांची भेट झाल्यानंतर गुरुचरण लवकरच ‘तारक मेहता…’ या मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. याबद्दल एकदा गुरुचरण यांनी सांगितले होते की, “मी गायब झालो होतो तेव्हा असित यांनी माझ्यासाठी एक मेसेज दिला होता. त्यांनी मला कॉल करण्यास सांगितले होते. माझ्या करिअरमध्ये असित यांची मोठी भूमिका बजावली आहे. त्यांना भेटणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते”.
त्यानंतर असित यांनीदेखील भाष्य केले होते. ते म्हणाले की, “माझ्यासाठी सोढी माझ्या कुटुंबासारखे आहेत. खासगी कारणांमुळे हा शो सोडल्यानंतर तो जेव्हा मुंबईमध्ये यायचा तेव्हा तो माझी आवर्जून भेट घ्यायचा. काही दिवसांपूर्वी त्याने जे केलं त्यामुळे मी खूप काळजीत होतो आणि या काळजीमुळे मी त्याला मेसेज केला. त्याचप्रमाणे तो माझ्या ऑफिसमध्ये आला आणि आम्ही दिलखुलासपणे गप्पा मारल्या”. असित यांच्या या विधानामुळे गुरुचरण पुन्हा या कार्यक्रमात दिसणार नाहीत असं स्पष्ट झालं आहे.