टीव्हीवरील वादग्रस्त तरीही तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकतीच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनला सुरुवात झाली असू पहिल्या दिवसापासूनचे घरातील सदस्यांचे एकेमेकांबरोबर खटके उडायला लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील पहिला दिवस स्पर्धकांसाठी कठीण गेला. ‘बिग बॉस’च्या घरातील पाणी बंद झाल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धकांना घरात पाणी नसल्याची जाणीव होते. त्यावेळी ते ‘बिग बॉस’ला घरात पाणी नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे सांगतात. तेव्हा हळूहळू सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळेल, असे ‘बिग बॉस’ने म्हटलं अशातच आता ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात निक्की व वर्षा यांच्यात भांडणं होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात वर्षा उसगांवकर या बेडवर झोपून राहिल्या होत्या.
त्यामुळे आता त्यांच्यामुळे घरातील सर्व सदस्यांना ‘बिग बॉस’ने शिक्षा दिली आहे आणि याच शिक्षेमुळे निक्की व वर्षा यांच्यात भांडण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता ‘बिग बॉस’ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळेल. नुकत्याच आलेल्या या प्रोमोमध्ये आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही, असं ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांना सांगतात. त्यावेळी ‘बिग बॉस’ची माफी मागत वर्षा “चुकून झालं”, असे म्हणते. त्यावर निक्की तांबोळी वर्षा यांच्यावर ओरडत बोलते.
याच प्रोमोवर आता नेटकऱ्यांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने “वर्षा उसगांवकर मॅडमची चप्पल पुसायची पण लायकी नाही. एव्हरग्रीन सुपरस्टार आहेत त्या” असं म्हणत निक्कीला सुनावलं आहे. आणखी एकाने “निक्की तांबोळी वर्षा मॅमचा खूपच अपमान करत आहे. ज्या मॅमला आपण लहानाचं मोठं सुपरस्टार म्हणून डोळ्यासमोर आपण बघत आलो, आपल्या डोळ्यासमोर असं अपमान होणे बिलकुल सहन होत नाही”. “या घरात सगळे समान आहेत. पण निक्की तांबोळी ज्या पद्धतीने बोलली ते असभ्य आहे”.
तसेच काहींनी “निक्कीला माहित आहे की वर्षा मॅडम प्रसिद्ध आहे म्हणून त्यांना टार्गेट करून निक्की हवे ते फुटेज मिळवत आहे”, “निक्की कुणाला आवरणार नाही. पण वर्षा उसगांवकर यांची अक्कल वगैरे काढणे तिला अजिबात शोभत नाही” असंदेखील म्हटलं आहे. दरम्यान, एकीकडे वर्षा यांचा चाहतावर्ग त्यांची बाजू घेत आहे तर निक्की तांबोळीचे चाहतेही तिची बाजू घेत आहेत. हा बिग बॉस शो आहे. त्यामुळे या घरात सगळे समान आहेत. कुणी ज्येष्ठ असल्यास त्याला सवलत नाही दिली पाहिजे. त्याचबरोबर निक्कीचे म्हणणे खरे असले तरी वर्षा यांच्या वयाचा व कर्तुत्वाचा मान् राखला गेला पाहिजे असंही लोकांचे म्हणणं आहे. अ