बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा परतणार सोढी, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “तो मला भेटला आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 30, 2024 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
asit modi on gurucharan singh

'तारक मेहता…'मध्ये पुन्हा परतणार सोढी, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य, म्हणाले, "तो मला भेटला आणि…"

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेने दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सगळ्यांच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. जेठालाल, दयाबेन, बाबूजी, तारक मेहता अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण काही कालावधीपासून एक नाव सतत चर्चेत आहे. या मालिकेमधील सोढी ही भूमिका अधिक लक्षात राहण्यासारखी आहे. ही भूमिका अभिनेता गुरुचरण सिंहने साकारली होती. मात्र वर्षाच्या सुरुवातीला गुरुचरण हे बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मात्र काही दिवसांतच तो घरी परतला अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. (asit modi on gurucharan singh)

सध्या गुरुचरण हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो लवकरच ‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये पुन्हा एकदा दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र एका अहवालानुसार असे नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुचरण यांनी असित मोदी यांना कार्यक्रमात पुन्हा येण्यासाठी खूप आग्रह केला. तसेच नवीन रोशन सोढी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचेही अभिनेत्याने सांगितले. मात्र यावर असित यांनी स्वतः यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

आणखी वाचा – “तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली?”, वर्षा उसगांवकरांना नको नको ते बोलली निक्की तांबोळी, म्हणाली, “तुमच्यामुळे आम्ही भोगतोय…”

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

गुरुचरण यांनी १६ जुलै जुलै रोजी मुंबईतील ऑफिसमध्ये भेट घेतली. त्यांची भेट झाल्यानंतर गुरुचरण लवकरच ‘तारक मेहता…’ या मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. याबद्दल एकदा गुरुचरण यांनी सांगितले होते की, “मी गायब झालो होतो तेव्हा असित यांनी माझ्यासाठी एक मेसेज दिला होता. त्यांनी मला कॉल करण्यास सांगितले होते. माझ्या करिअरमध्ये असित यांची मोठी भूमिका बजावली आहे. त्यांना भेटणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते”.

आणखी वाचा – उपचारासाठी अमेरिकेमध्ये जाणार शाहरुख खान, पण नक्की झालंय तरी काय?, चाहत्यांमध्येही काळजीचं वातावरण

त्यानंतर असित यांनीदेखील भाष्य केले होते. ते म्हणाले की, “माझ्यासाठी सोढी माझ्या कुटुंबासारखे आहेत. खासगी कारणांमुळे हा शो सोडल्यानंतर तो जेव्हा मुंबईमध्ये यायचा तेव्हा तो माझी आवर्जून भेट घ्यायचा. काही दिवसांपूर्वी त्याने जे केलं त्यामुळे मी खूप काळजीत होतो आणि या काळजीमुळे मी त्याला मेसेज केला. त्याचप्रमाणे तो माझ्या ऑफिसमध्ये आला आणि आम्ही दिलखुलासपणे गप्पा मारल्या”. असित यांच्या या विधानामुळे गुरुचरण पुन्हा या कार्यक्रमात दिसणार नाहीत असं स्पष्ट झालं आहे.

Tags: asit modigurucharan singhtaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Marathi new season audience responded on Varsha Usgaonkar and Nikki Tamboli promo through comments

"त्यांची चप्पल पुसायचीही तुझी लायकी नाही", वर्षा उसगांवकरांची अक्कल काढल्यानंतर निक्कीवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, "असभ्य बोलणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.