टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमधील सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या अधिक लक्षात आहेत. जेठालाल गाडा, दयाबेन, बापुजी, भिडे गुरुजी यांच्या भूमिकेला आजवर खूप प्रेम मिळाले आहे. डॉ. हाथी ही सगळ्यांचीच एक लोकप्रिय भूमिका आहे. ही भूमिका अभिनेता निर्मल सोनी यांनी साकारली होती. त्यांनी अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आहे. या मालिकेत येण्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. (dr. hathi on taarak mehta ka oolta chashma)
‘तारक मेहता…’ या मालिकेमुळे त्यांना अधिक ओळख मिळाली. मात्र त्यांनी २००८ साली ही मालिका सोडली आणि पुन्हा एकदा २०१८ साली ते पुन्हा या मालिकेमध्ये परतले. पण इतके वर्ष मालिकेत न दिसण्याचे काय कारण होते? याबद्दल जाणून घेऊया. निर्मल यांच्या ‘तारक मेहता…’ मधील भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. एका वेळी तब्बल १५-२० जणांचा एक ग्रुप त्यानच्या मागे पडला होता. याबद्दल ते म्हणाले की, “शरद संकला व मी गुजरातमध्ये एका इव्हेंटमध्ये सहभागी झालो होतो. तेव्हा खूप गर्दी झाली होता. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिथून निघालो त्यानंतर आम्ही कसेतरी बाहेर पडलो. पण आम्ही कारमधून बाहेर पडलो तेव्हा १५-२० जण आमचा पाठलाग कारायले लागले. त्यांनी सुमारे १० किलोमीटरपर्यंत आमचा पाठलाग केला. पण त्यांना लागू नये असं आम्हाला वाटत होतं”.
‘तारक मेहता…’ हे पहिल्यांदा डॉ. हाथी यांची भूमिका करत होते. मात्र २००८ साली त्यांनी हा शो सोडला. त्यानंतर रवी कुमार हे ती भूमिका करु लागले. पण त्यानच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा निर्मल यांना या भूमिकेसाठी विचारले गेले आणि ते या शोमध्ये पुन्हा काम करु लागले. त्यांनी एकदा एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “मी एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करु शकत नव्हतो”.
पुढे ते म्हणाले की, “त्यावेळी माझ्याकडे दोन पर्याय होते. म्हणजेच मी एकतर ‘तारक मेहता…’साठी काम करु शकत होतो किंवा हे सोडून इतर प्रोजेक्टवर काम करु शकणार होतो. त्यामुळे मी ‘तारक मेहता…’ सोडण्याचा निर्णय घेतला”. मात्र १० वर्षांनी पुन्हा ते या मालिकेमध्ये परत आले आणि त्यांनी पुन्हा कधीही ही मालिका न सोडण्याचा निर्णय घेतला.