‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सध्या ती अनेक कारणांमुळे अधिक चर्चेत आली आहे. जेनिफर यांची लहान बहीण डिपलचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या लहान भावाचे निधन झाले असून तेव्हाच तिची बहीण व्हेंटिलेटर होती. पण आता तिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता जेनिफरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (jennifer mistry bansiwal sister death)
डिपल काही दिवसांपासून व्हेंटिलेटर होती. १३ एप्रिल रोजी तीचे निधन झाले. डिंपल ही दिव्यांग होती तसकह मृत्यूसमयी तीचे वय ४५ वर्ष होते. जेनिफरने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझी लाडकी बहिण, तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे मी तुझ्याकडून शिकले. परिस्थिति कशीही असली तरीही त्यामध्ये कसे हसावे हे तुझ्याकडून शिकायला मिळाले. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो”.

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बहिणीच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की “माझ्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आली आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि यावेळी तिला माझी सर्वात जास्त गरज आहे. तिची प्रकृती खूपच गंभीर आहे आणि ती तिच्या आजारपणाचा संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत मला तिच्याबरोबर राहावे लागत आहे.”
याआधी २०२२ साली जेनिफरच्या लहान भावयाचे निधन झाले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने तारक मेहता…” या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच एका माध्यमाला माहिती देताना सध्या अधिक काम नसल्याने आर्थिक परिस्थिति चांगली नसल्याचेही तिने सांगितले होते. आशातच तिला तिच्या बहिणीच्या आजाराचा सर्व खरच तिला करावा लागत असल्याचेही ती म्हणाली होती.