आजचा काळ हा सोशल मीडियाचा असल्यामुळे सर्वसामान्य लोकांप्रमाणे, अनेक सेलेब्रिटी देखील यात सहभाग घेऊन नवीन काही तरी करू पाहत असतात. “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांची मन जिकंली. या मालिकेत स्वातीने नेहाच्या वहिनीची भूमिका साकारली होती. तसेच स्वातीचा नवरा तुषार देवल हा सुद्धा “चला हवा येउद्या” या कार्यक्रमात संगीत संयोजग आणि संगीतकार म्हणून काम करतो. हे दोघे नेहमी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच तुषारने पत्नी स्वातीसोबतचा एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Swati’s Scary Makeup)
हे देखील वाचा: आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
या व्हिडियोमध्ये तुषार झोपलेला असताना त्याची पत्नी स्वाती त्याला उठवत असते. परंतु त्याने डोळे उघडल्यानंतर स्वातीला बघतो आणि ओरडतो. कारण स्वातीने चेहऱ्याला फेसपॅक लावलेला असतो. या व्हिडिओला तुषारने “पुन्हा एकदा बायकोच्या ब्युटी टिप्स नी जीव घेतला असता” असे फनी कॅप्शन दिले आहे.
तुषारच्या या व्हिडिओवर अभिनेता कुशल बद्रिकेने “तुम्ही दोघे खूप कमाल आहात, मी दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहे ” अशी कमेंट केली आहे. (Swati’s Scary Makeup)

तुषार देवल आणि स्वाती देवल यांनी त्यांचं करिअर घडवण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. परंतु त्या दोघांना एकमेकांची अमूल्य साथ असल्यामुळे येईल त्या संकटाला दोन हात करत आज ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत.
हे देखील वाचा: प्रसादच्या पोस्टवर विशाखाने व्यक्त केली नाराजी…
प्रत्येकाला असं वाटत असतं कि आपल्या स्वप्नातलं घर घ्यावं. रोजची धावपळ करणारी मंडळी असच एक स्वपन उराशी बाळगून दिवस रात्र महान करत असतात. आणि आयुष्यात एक दिवस तरी असा येईल जेव्हा आपण आपल्या स्वप्नातले घर विकत घेऊ या आशेवर तो आयुष्य जगात असतो. तुषार आणि स्वातीने अनेक वर्षे भाड्याच्या घरात काढल्यानंतर स्वतःचे हक्काचे घर मुंबईत घेतले होते. स्वातीने कुंकू, कळत न कळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फु बाई फु तसेच पुढचं पाऊल या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.