दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली असून अनेकजणांचे विवाहसोहळे आता पार पडत आहेत. अशातच मराठी मनोरंजन सृष्टीतील एका अभिनेत्यानेदेखील नुकतीच लग्नगाठ बांधली आहे आणि हा अभिनेता म्हणजे निखिल राजेशिर्के. आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निखिलने काल (रविवार, १७ नोव्हेंबर) रोजी विवाहगाठ बांधली. निखिलने चैत्राली मोरे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच अभिनेत्याने रविवार लग्नगाठ बांधली. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. (Nikhil Rajeshirke Marriage)
अहिनेत्री अभिज्ञा भावेनेदेखील निखिल राजेशिर्केच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. याचा खास फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर निखिल व त्याची पत्नी चैत्राली मोरे यांचा लग्नातील फोटो शेअर केला आहे आणि “माझ्या जोडीदाराचे अभिनंदन. आनंदी वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणत त्यांना लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. निखिल व चैत्राली यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि त्याच्यावर अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर चैत्रालीबरोबरचा फोटो शेअर करत ‘चाहूल नव्या प्रवासाची’ अशी कॅप्शन दिलं होतं. तर
तर आणखी एका पोस्टमध्ये त्याने त्यांच्या प्री-वेडिंग शूटचे काही फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामध्ये चैत्रालीने लाल रंगाची साडी नेसल्याचे दिसले; तर निखिलने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर लग्नातही या दोघांनी खास लूक केल्याचे पाहायला मिळाले. निखिलने ऑफ व्हाईट रंगाची शेरवाणी व त्यावर फेटा असा खास लूक केला होता तर त्याच्या पत्नीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. दोघेही या लूकमध्ये छान दिसत होते.
आणखी वाचा – आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video
दरम्यान, निखिल ‘अरुंधती’, ‘छोटी मालकीण’, ‘रंग माझा वेगळा’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला आहे. तसंच तो ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात तो ‘एलिमिनेट’ झाला होता. यामुळे त्याची चांगली चर्चा झाली होती. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने साकारलेल्या अविनाश या पात्राचे मोठे कौतुक झाले. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत त्याने सुजयची भूमिका निभावली होती.