शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दुनियादारी’चं त्रिकुट ११ वर्षांनी पुन्हा एकत्र, स्वप्निल-सई-अंकुश यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नाव काय असणार?

Saurabh Moreby Saurabh More
जून 5, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swapnil Joshi, Ankush Chaudhari, Saie Tamhankar and Sanjay Jadhav is once again coming up with a new film see the details

'दुनियादारी'चं त्रिकुट ११ वर्षांनी पुन्हा एकत्र, स्वप्निल-सई-अंकुश यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नाव काय असणार?

‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, या गाजलेल्या चित्रपटांतून अभिनेता स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स व धुरळा या चित्रपटातून अभिनेता अंकुश चौधरी व सई ताम्हणकर या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर ‘दुनियादारी’ या चित्रपटात स्वप्निल, अंकुश व सई हे त्रिकुट पाहायला मिळाले होते.

‘दुनियादारी’ या चित्रपटाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता ‘दुनियादारी’ या गाजलेल्या चित्रपटानंतर स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी व दिग्दर्शक संजय जाधव ही टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी व संजय जाधव यांच्या यांच्या आगामी नवीन चित्रपटाबद्दल नुकतीच माहिती देण्यात आली असून या तिघांना पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by ishaanッ (@ishaan_khopkar)

या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी अद्याप गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी व संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांना त्यांच्या नवीन चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच ही टीम आता पुन्हा कोणता नवीन चित्रपट घेऊन येणार? या चित्रपटाचे नाव काय असणार? यात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार? याची सर्वजण वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – घरी परतल्यानंतर रुपालीचं रुपच बदललं, सासूच्या फोटोसमोर उभं राहून रडताना नेत्राने तिचा गळाच पकडला अन्…; नाटक की आणखी काही?

या चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून तब्बल ११ वर्षांनंतर ही टीम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी व निनाद बत्तीन हे निर्माते आहेत.   

आणखी वाचा – “पक्ष फोडणे, ईडी अन्…”, निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “खरे वाघ…”

दरम्यान, निर्माते अमेय खोपकर यांनी “अंकुश, सई, स्वप्निल यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमबरोबर माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags: ankush chaudharimarathi entertainment newssaie tamhankarswapnil joshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Titeeksha Tawde Injured

'सातव्या मुलीची…'चा सीन शूट करताना तितीक्षा तावडेला दुखापत, रुग्णालयामध्येही घेऊन गेले अन्…; म्हणाली, "डॉक्टरांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.