शुक्रवार, ऑगस्ट 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरी परतल्यानंतर रुपालीचं रुपच बदललं, सासूच्या फोटोसमोर उभं राहून रडताना नेत्राने तिचा गळाच पकडला अन्…; नाटक की आणखी काही?

Saurabh Moreby Saurabh More
जून 5, 2024 | 12:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Rupali once again returned to the family of Rajadhyaksha in her new look

घरी परतल्यानंतर रुपालीचं रुपच बदललं, सासूच्या फोटोसमोर उभं राहून रडताना नेत्राने तिचा गळाच पकडला अन्...; नाटक की आणखी काही?

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अनेक ननवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत रुपालीच्या वशमधून सगळे बाहेर आल्यानंतर एक नवीन ट्विस्ट आला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा नवीन ट्विस्ट म्हणजे नेत्राच्या आई होण्याचा. मालिकेत नेत्राने नुकतीच आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. त्यामुळे राजाध्यक्षांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे.

अशातच मालिकेत नुकताच नेत्राने दिलेल्या खुशखबरमुळे आनंदी वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागामध्ये नेत्रा छान साडी घालून घरच्या हॉलमध्ये येते तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच बसतो. यावर घरातील सगळे नेत्रा व अद्वैतची मस्करी करतात. नेत्रा व अद्वैत यांनी दिलेल्या या खुशखबरनिमित्त राजाध्यक्ष कुटुंबीय जेवायला जातात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यावेळी सगळेजण हे कुटुंब असंच एकत्र राहिले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. यावेळी कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील या नवीन सुरुवातीबद्दल आपापली मते व्यक्त करतात. सगळेजण याबद्दल नेत्रा व इंद्राणी यांचे आभार मानतात. तसेच अद्वैतही वडील होण्याचा आनंद व्यक्त करतो. यावेळी नेत्राही तिची इच्छा व्यक्त करत “तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. हीच माझी इच्छा आहे” असं म्हणते.

आणखी वाचा – Video : पारू, आदित्य व दिशा यांचा ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्यावर भन्नाट डान्स, सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

अशातच मालिकेच्या पुढील भागात राजाध्यक्षांच्या घरात रुपाली परत आली आहे. घरात येताच ती तिच्या सासूच्या फोटोकडे बघून “हे कसं झालं? तुम्ही आम्हाला कशा सोडून गेल्या हे कळलं पण नाही” असं म्हणताना दिसत आहे. यानंतर तिथे नेत्रा येते तेव्हा रुपाली नेत्राला “हे सगळं कसं झालं” असं म्हणते. मात्र यावर नेत्रा रुपालीचा गळा पकडते आणि “तू जीवंत कसा विरोचका?” असं म्हणते.

आणखी वाचा – “पक्ष फोडणे, ईडी अन्…”, निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “खरे वाघ…”

यामुळे आता मालिकेत एकीकडे नेत्राच्या गरोदरपणाच्या बातमीने सर्व आनंदी आहेत. तर दूसरीकडे रुपाली घरात आल्याने नेत्राला विरोचक जीवंत कसा? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.              

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pradeep Rawat passing
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे ७४व्या वर्षी निधन, सलमान खानही भावुक, म्हणाला, “अनेक चांगले…”

ऑगस्ट 6, 2026 | 10:53 am
dipika kakar ibrahim emotional
Entertainment

कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

ऑगस्ट 4, 2026 | 10:03 am
Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Next Post
Sonu Nigam Singh Tweet Viral

अयोध्येत भाजपाचा पराभव, मात्र निकालानंतर सोनू निगमवर लोकांनी काढला राग, सोशल मीडियावरही गदारोळ, नेमका प्रकार काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.