Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा काल (दि. २५ डिसेंबर) रोजी पार पडला. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व उपस्थित कलाक्षेत्रातील कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. स्वानंदीच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अशातच स्वानंदीच्या लग्नात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनीही हजेरी लावली.
सुप्रिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन स्वानंदीच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वानंदीच्या लग्नातील धामधूम पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुप्रिया यांनी स्वानंदी बरोबरचा तसेच तिच्या आई बरोबरचा सेल्फीही शेअर केला आहे; या व्हिडीओसह सुप्रिया यांनी कॅप्शन देत “आणि आज माझ्या स्वानु म्हणजेच स्वानंदी टिकेकरचं लग्न थाटात पार पडलं, खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद स्वानंदी-आशिष, सुखी राहा” असं म्हणत दोघांना शुभाशीर्वाद दिले आहेत.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा असा पार पडला साखरपुडा सोहळा, फोटो आले समोर
सोनी मराठी वाहिनीवरील ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे व स्वानंदी टिकेकर एकत्र झळकल्या होत्या. मालिकेतील या दोघींचं बॉण्डिंग साऱ्यांनाच विशेष भावलं. सुप्रिया यांनी थेट स्वानंदीच्या लग्नाला हजेरी लावत तिला आशीर्वाद दिले. फुलांनी सजलेल्या मंडपात अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. स्वानंदीच्या लग्नाच्या फोटोंमध्ये नववधूवराचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.
स्वानंदी-आशिष यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले. यांत दोघेही अत्यंत आनंदी असलेले पाहायला मिळाले. स्वानंदीने लग्नासाठी पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती. त्यावर तिने घेतलेला हिरव्या रंगाचा शेला लक्षवेधी ठरला. तर आशिषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली. अंत्यत साधा व आकर्षक अशा दोघांचा लूक प्रेक्षकांनाही विशेष भावला आहे.