काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिच्या लग्नाची सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली. गौतमीने स्वानंद तेंडुलकरसह लग्नगाठ बांधली. स्वानंद हा कन्टेन्ट क्रिएटर आहे. गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. गौतमी व स्वानंद यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गौतमी – स्वानंदच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Gautami Deshpande and Swanand Tendulkar)
गौतमी-स्वानंदच्या लग्नाच्या व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नाआधीचे व लग्नानंतरचे लूक्स चाहत्यांना विशेष आवडले. लग्नानंतर दोघेही त्यांच्या लग्नाच्या धावपळीनंतर कोकणात गेलेले पाहायला मिळाले. कोकणात त्यांनी सुट्ट्यांचा मनमुराद आंनद लुटला असून यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केल्याचे देखील पाहायला मिळाले.
गौतमी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. लग्नानंतर तर ती तिच्या नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शेफ मिस्टर स्वानंद तेंडुलकर असं कॅप्शन देत तिने नवऱ्याने बनवलेल्या पदार्थांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ब्रेड चीझ पिझ्झा बनवलेला दिसत आहे. सध्या गौतमी व स्वानंद त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस १७’ चा अंतिम सोहळा, विजेत्याला मिळणार इतकी रोख रक्कम अन्…
काही दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या नवऱ्याबरोबरच्या डिनर डेटचा फोटोही इन्स्टाग्रामवरुन स्टोरी पोस्ट करत शेअर केला होता. डिनर डेटचा शेअर केलेल्या या फोटोमध्ये दारूचा ग्लास व विविध पदार्थ ठेवलेले पाहायला मिळाले. डिनर डेटच्या या फोटोसह तिने, “माझ्या खास व्यक्तीसह डिनर डेट” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली. तर स्वानंदने ही पोस्ट रिपोस्ट करत, “चल खोटं नको बोलूस” अशी कॅप्शन दिलं.