ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याने आजवर तिच्या अप्रतिम अभिनयाने, सौंदर्याने, बुद्धिमत्तेने व शांत स्वभावाने तिच्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडली नाही. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या व तिच्या सासरच्या मंडळींमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या आणि तेव्हापासून कुटुंबाबाबत सातत्याने अनेक गोष्टी समोर येताना दिसल्या. (Jaya Bachchan On Aishwarya Rai)
बच्चन कुटुंबातील कोणीही या अफवांकडे लक्ष दिलेले नाही, परंतु अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने जया बच्चन रागवतना दिसल्या. शिवाय, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनचे रणबीर कपूरबरोबरचे इंटिमेट सीन हे ऐश्वर्या राय बच्चन व तिच्या सासरच्या लोकांमध्ये भांडण होण्याचे अनेक कारणांपैकी एक कारण होते, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. दरम्यान अभिनेत्रीच्या सासू जया बच्चन यांनी यावर एकदा भाष्य केलेलं पाहायला मिळालं. चित्रपटांमधील इंटिमेट सीनवर त्यांनी टीका केली.
जया बच्चन यांनीही आजच्या चित्रपटांवर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “आजचे चित्रपट हे बहुतांश व्यासायिक दृष्टिकोनातून केले जातात. लोकांना पैशाशिवाय कशाचीही पर्वा नसते”. अलीकडच्या चित्रपटांमधील इंटिमेट सीन्सवरही या ज्येष्ठ अभिनेत्रीने टीका केली आणि सांगितले की, “लोकांना आता असे सीन्स करताना लाज वाटत नाही कारण ते अभिनयातील बारकावे विसरले आहेत. आजच्या काळात प्रेमाचं प्रदर्शन का केलं जातं, असा प्रश्नही जया यांनी विचारला. ऐश्वर्या हिच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटामधील इंटिमेट सीनबाबत जया बच्चन काही बोलल्या नसल्या तरी याबद्दल त्यांचा बोलण्याचा दृष्टीकोन बरंच काही सांगून जातो. जया बच्चन म्हणाल्या, “यांना लाज वाटत नाही”.
एकीकडे जया बच्चन यांनी ‘ए दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्याच्या इंटिमेट सीनवर आक्षेप घेतला आणि आताच्या चित्रपटांमधील अशा या सीनवर टीका केली. तर दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांनी त्याच चित्रपटातील आपल्या सुनेच्या भूमिकेचं कौतुक केलं.