शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

म्हावऱ्याचा बेत अन् शाकाहारी मेजवानी; मुक्ता-सागरच्या केळवणाची अलिबागमध्ये जय्यत तयारी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2023 | 6:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
premachi goshta serial fame mukta and sagar went to alibaug for wedding special kelvan

म्हावऱ्याचा बेत अन् शाकाहारी मेजवानी; मुक्ता-सागरच्या केळवणाची अलिबागमध्ये जय्यत तयारी

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. मालिकेतील मुक्ता फेम तेजश्री प्रधान व सागर म्हणेजच अभिनेता राज हंचनाळे या कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. त्याचबरोबर मालिकेचे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच मालिकेत आता सध्या मुक्ता व सागर यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत साखरपुडा, मेहंदी, संगीत व हळद हे कार्यक्रम पार पडले असून आगामी भागांत मालिकेचे विवाह स्पेशल भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. (Preamchi Goshta Serial New Promo)

त्यापूर्वी मुक्ता व सागर एका खास सोहळ्यासाठी थेट अलिबागमध्ये पोहोचले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये ते अलिबागला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात मुक्ता व सागरचं केळवण अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता.

View this post on Instagram

A post shared by Nalinee Pandurang Mumbaikar (@nalineemumbaikar)

आणखी वाचा – “चित्रपटासमोर सगळं क्षुल्लक…”, ‘अ‍ॅनिमल’मधून परिणीती चोप्राच्या हकालपट्टीवर संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा, म्हणाले “काही पात्र कलाकारांना शोभत…”

कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं आणि मग मुक्ता व सागर यांच्या केळवणाचा खास बेत रंगला. अलिबागकरांचं हे प्रेम पाहून मुक्ता व सागर हेदेखील भारावून गेले. सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय असणाऱ्या नलिनी मुंबईकर या इन्फ्लूएन्सर काकूंनी त्यांचे केळवण केले. कोळी कुटुंबातील सागरचे केळवण असल्याने त्यांनी यावेळी खास माशांचा बेत केला, तर मुक्ता गोखलेसाठी शाकाहारी जेवणाची मेजवानी’होती. नलिनी यांनी नुकताच सोशल मीडियावर या केळवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – अरबाजच्या खानच्या ‘त्या’ कृतीने दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम, अभिनेत्यानेच केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणाही घेतला. ‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी, अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात.’ असा हटके उखाणा घेत मुक्ताने अलिबागकरांचे मन जिंकले आहे. दरम्यान, या खास केळवणासाठी चाहतेदेखील चांगलेच उत्सुक आहेत.

Tags: entertainment newsmarathi entertainmentMarathi newsmarathi serialpremachi goshta
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
bigg boss 17 abdu rozik and raveena tondon will be enter in weekend ka vaar new promo viral on social media

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अब्दू रोझिक 'सांता' बनून करणार प्रवेश, घरातल्या सदस्यांना देणार 'हे' खास गिफ्ट्स, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.