सध्या बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खूप चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर ती पूर्णपणे कोसळलेली दिसून आली. मात्र हळू हळू या दु:खातून ती स्वतःला सावरताना दिसत आहे. याममध्ये तिला तिचं कुटुंबं खूप साथही देताना दिसत आहे. वडिलांच्या निधनाच्या वेळी तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानही तिच्या बरोबर असलेला दिसून आला. अरबाजने तिची बिलकुल साथ सोडली नाही. अरबाज व मलाइका आज वेगळे झाले असले तरीही त्यांचा मुलगा अरहान हा दोघांनाही जोडून ठेवतो. तो अनेकदा आईबरोबर दिसून येतो तसेच तो खान कुटुंबाबरोबरही वेळ घालवताना दिसून येतो. (malaika arora son viral video)
अरबाजने काही वर्षांपूर्वी शूरा खानबरोबर लग्नगाठ बांधली. अरबाज अनेकदा शूराबरोबर बाहेर फिरताना दिसतो. अशातच आता अरहान व शूरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तसेच चौकार व षटकारही लगावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकीकडे मलायका तिच्या ब्रेकअपमधून बाहेर पडत आहे तर मुलगा अरहान सावत्र आईबरोबर क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहे. दोघांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
शूरा अरहानची सावत्र आई असली तरीही दोघांमधील बॉंड खूप चांगला आहे. अरबाजच्या दुसऱ्या लग्नात अरहान खूप खुश असलेला दिसून आला. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे एकदम टॉम अँड जेरीसारखे दिसत आहेत. जे एका छोट्याश्या ग्राऊंडमध्ये क्रिकेट खेळत आहेत”.
दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “आयपीएलपेक्षा तर हे क्रिकेट बघायला मजा येत आहे”, तसेच अजून एकाने लिहिले की, “कसा मुलगा आहे हा? असं मलायका म्हणत असेल”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होत आहे. २२ व्या वाढदिवसादिवशी शूराने अरहानचा एक व्हिडीओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.