गुरूवार, एप्रिल 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा; जान्हवी किल्लेकरसह धनंजय पवार यांची खास हजेरी, लग्नमंडपात ग्रँड एन्ट्रीपासून ते हळदीपर्यंत सगळ्याची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 29, 2025 | 4:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Wedding

जान्हवी किल्लेकरसह धनंजय पवार यांची खास हजेरी

Suraj Chavan Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नाची वार्ता थेट सोशल मीडियावरून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण याचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरज लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्यांना खूपच चर्चेत होत्या. अखेर तो दिवस आला असून आज म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी सुरज चव्हाण आणि त्याची प्रेयसी संजना गोफणे यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे.

सुरजच्या लग्नाआधीच्या सर्व विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी त्याचा हळदीचा समारंभ जल्लोषात पार पडला. या समारंभाला ‘बिग बॉस मराठी’ पाच मधील सहकलाकार धनंजय पवार (DP) आणि जान्हवी किल्लेकर यांनीही हजेरी लावली. हळदीदरम्यानचा त्यांचा मस्तीने भरलेला संवाद आणि डान्स याचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला लागली हळद, आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन केली सुरुवात; घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

याचदरम्यान, सुरज चव्हाणचा एक भन्नाट व्हिडीओही सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सुरजची मंडपात होणारी ग्रँड एन्ट्री पाहायला मिळते. मोठ्या ब्रँडेड कारमधून स्टायलिश अंदाजात उतरलेला सुरज, हातात फुलांची माळ आणि चेहऱ्यावर तेज घेऊन अगदी सिनेमॅटिक अंदाजात मंडपात प्रवेश करताना दिसतो. उपस्थित मंडळींचा जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि नवरदेवाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे जाणवत आहे.

आणखी वाचा – “मुलगी झाली रे…” सुप्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गुडन्यूज देत खास पोस्ट शेअर करत म्हणाला…

सुरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेनुसार ‘बिग बॉस मराठी’ पाचमधील अनेक कलाकार जसे अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री निकी तांबोळी, अरबाज पटेल यांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमारही सुरजच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगत आहे. सध्या संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वात सुरज चव्हाणच्या लग्नाचीच चर्चा आहे. त्याच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ आणि अपडेट पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.

Tags: entertainmentmarathi entertainment newssuraj chavan wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress Serial will go Off Air
Entertainment

१० वर्षांनंतर मालिकेत कमबॅक केलं, मराठमोळ्या अभिनेत्रीची मालिका तीन महिन्यातच बंद?

एप्रिल 1, 2026 | 3:00 pm
priyanka chopra seva at golden temple
Entertainment

डोक्यावर ओढणी, भांडी घासली आणि…; सुवर्ण मंदिरातील प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले, म्हणाले…

एप्रिल 1, 2026 | 2:28 pm
Parineeti Chopra and Raghav Chadha
Entertainment

“बाळाचा हक्क फक्त आईचाच नाही”, राघव चड्ढांची ‘पॅटरनिटी लीव्ह’साठी मागणी, पत्नी परिणीती चोप्राकडून कौतुक

एप्रिल 1, 2026 | 12:30 pm
jennifer mistry on dayaben comeback
Entertainment

‘तारक मेहता…’मध्ये दयाबेन कधीच येणार नाही, मिसेस सोढ़ी फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “ती संसारात…”

एप्रिल 1, 2026 | 11:30 am
Next Post
Suraj chavan Wedding

लग्नात गैरहजर पण…; लग्नानंतर लाडक्या भावाला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली, "जीवनात कितीही बदल झाले तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.