शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणला लागली हळद, आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन केली सुरुवात; घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 28, 2025 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Haladi

सूरज चव्हाणला लागली हळद, आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन केली सुरुवात; घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

Suraj Chavan Haladi : ‘बिग बॉस मराठी’ फेम विजेता सूरज चव्हाणची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. २९ नोव्हेंबरला सूरज लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या लग्नाआधीची धामधूम पाहायला मिळाली. त्याच्या प्री-वेडिंगचेही फोटो समोर आले. दोघांनी पुण्यात एका स्टुडिओत हे शूट केले. त्याच्या फोटोंना युजर्सनी खूप पसंती दिली. यानंतर सूरज आणि त्याची पत्नी संजना यांचा मेहंदी सोहळा पार पडला. लग्नासाठी संजनाने हातावर खूपच सुंदर मेहंदी काढून घेतली. तर सूरजनेही त्याच्या हातावर मेहंदी काढली. सोशल मीडियावर सूरज आणि संजना यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच त्याच्या हळदी समारंभाचे खास क्षणही समोर आले.

अखेर सूरजला हळद लागली असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्याच्या लग्नाचा घाना भरतानाचा व्हिडीओही समोर आला. आई-वडिलांच्या फोटोचे स्मरण करुन सूरज हळदीसाठी तयार झाला. यावेळी त्याच्या सगळ्या बहिणी उपस्थित होत्या. भावाच्या लग्नासाठी बहिणींचा थाटमाटही पाहायला मिळाला. सूरजच्या नव्या घरात त्याचा हळदी समारंभ पार पडला. सध्या सूरजच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उद्या म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी सूरज व संजना यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

आणखी वाचा – “मुलगी झाली रे…” सुप्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गुडन्यूज देत खास पोस्ट शेअर करत म्हणाला…

लग्नाच्या चर्चांदरम्यान सूरजची लग्नपत्रिका सुद्धा व्हायरल झाली. त्या पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थित व्यक्तींची नावं आता चर्चेत आहेत. सूरज चव्हाणच लग्न एक मोठा इव्हेंट असल्याचे वाटते कारण या लग्नात केवळ मराठी सेलिब्रिटीच नव्हे तर बॉलीवूड दिग्गजांची सुद्धा उपस्थिती लागणार आहे.

Tags: haladi ceremonySuraj Chavansuraj chavan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Suraj Chavan Wedding

सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा; जान्हवी किल्लेकरसह धनंजय पवार यांची खास हजेरी, लग्नमंडपात ग्रँड एन्ट्रीपासून ते हळदीपर्यंत सगळ्याची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.