शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलगी झाली रे…” सुप्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गुडन्यूज देत खास पोस्ट शेअर करत म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 28, 2025 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Waghmare Become Father

अक्षय वाघमारे पुन्हा एकदा बाबा झाला

Akshay Waghmare Become Father : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे पुन्हा एकदा बाबा झाला आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारा अक्षय आपल्या वैयक्तिक आयुष्यातील छोट्या-मोठ्या क्षणांची माहिती चाहत्यांसह शेअर करत असतो. नुकतेच त्याने एका खास पोस्टद्वारे आपल्या घरात पुन्हा लक्ष्मीचे आगमन झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी वाघमारे यांचा विवाह २०२० मध्ये झाला. अक्षय आणि योगिताला आधीच एक मुलगी आहे. आता त्यांच्या घरी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला असून, कुटुंबात आनंदाचे वातावरण झाल्याच पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अक्षयने “सीझन २ रिलीज… पोरगी झाली रे, इट्स अ बेबी गर्ल” असे कॅप्शन देत हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. अक्षयची ही गुडन्यूज समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री मेघा धाडे, भक्ती देसाई यांसह अनेकांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

आणखी वाचा – कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

मे २०२१ मध्ये अक्षय आणि योगिता पहिल्यांदा पालक झाले होते. त्यावेळीही त्यांनी मुलीच्या आगमनाचा आनंद मोठ्या उत्साहात व्यक्त केला होता. आता दुसऱ्या मुलीच्या जन्मानिमित्तही त्यांनी मोठ्या उत्साहात कन्याप्राप्तीचा आनंद व्यक्त केला आहे. अक्षयने शेअर केलेले फोटो आणि पोस्ट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अक्षय वाघमारेचा हा आनंदाचा क्षण पाहून मराठी इंडस्ट्रीतूनही सध्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन, वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tags: Akshay Waghmare Become Fathermarathi entertainment newsMarathi industry latest news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Suraj Chavan Haladi

सूरज चव्हाणला लागली हळद, आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन केली सुरुवात; घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.