शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नात गैरहजर पण…; लग्नानंतर लाडक्या भावाला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली, “जीवनात कितीही बदल झाले तरी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 1, 2025 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj chavan Wedding

लग्नात गैरहजर पण…; लग्नानंतर लाडक्या भावाला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली, "जीवनात कितीही बदल झाले तरी…"

Suraj chavan Wedding : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता सूरज चव्हाणच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. २९ नोव्हेंबरला सूरज चव्हाणचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. यांत सूरजच्या लग्नासाठी तोबा गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर सूरजच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. ‘बिग बॉस’ फेम जान्हवी किल्लेकर सूरजच्या लग्नात भलताच भाव खाऊन गेली. मात्र यावेळी सूरजची ‘बिग बॉस’ पासून झालेली बहीण अंकिता वालावलकर काही दिसली नाही. त्यामुळे सूरजच्या लग्नात अंकिताला अनेकांनी मिस केलं.

सूरजची लगीनघाई सुरु होती तेव्हा अंकिता त्याच्या शॉपिंगच्या वेळी त्याच्याबरोबर होती. मात्र, लग्नाला ती जाऊ शकली नाही. आणि याबाबत तिने आधीच एका व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. असं असलं तरी सूरज व संजनावर अक्षता पडताच त्यांचा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अंकिताने दोघांनाही शुभेच्छा दिल्या. लाडक्या भावाच्या लग्नासाठी अंकिताने खास पोस्ट शेअर केली.

आणखी वाचा – सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा; जान्हवी किल्लेकरसह धनंजय पवार यांची खास हजेरी, लग्नमंडपात ग्रँड एन्ट्रीपासून ते हळदीपर्यंत सगळ्याची चर्चा

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

अंकिताने सूरज संजनाचा लग्नातील व्हिडीओ शेअर करत, “प्रिय सूरज आणि संजना… आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या; पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत – असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या-छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे! तुमच्या नवविवाहित जीवनाला मनःपूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! – अंकिता आणि कुणाल!”, असं म्हटलं.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला लागली हळद, आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन केली सुरुवात; घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

सूरज-संजना आता अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांचा प्रेमविवाह आहे. संजना त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. दोघांच्या लग्नाला चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लग्नानंतरचे विधी संपवून आता सूरज देवदर्शनाला पोहोचला आहे.

Tags: ankita walavalkarentertainmentsuraj chavan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Soham Bandekar Wedding Rituals

बायकोला पाहायला उतावळा झालाय सोहम बांदेकर, मेहंदीचे फोटो शेअर करत पूजाला म्हणाला, "तयार राहा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.