शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “मला शिक्षण घ्यायला जमलं नाही पण…”, शाळकरी मुलांसमोर सूरज चव्हाणचं भाषण, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 26, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Video

शाळकरी मुलांसमोर सूरज चव्हाणचं भाषण, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

Suraj Chavan Video : ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ या पर्वाचीही सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने विजेतेपद जिंकलं. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सूरज तर ‘बिग बॉस’नंतर अधिक चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात बारामतीकर सूरज चव्हाणने हवा केली. झापून झुपक स्टाईलने सूरजने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली.

टिकटॉकमुळे सूरज सोशल मीडियावर चर्चेत आला. यानंतर तो रीलकडे वळला. सूरजला त्याचे काही व्हिडीओ पाहून सुरुवातीच्या काळात प्रचंड ट्रोल करायचे. पण, ‘बिग बॉस’मुळे हळुहळू सगळेजण त्याचे चाहते झाले. आई-वडिलांचं छत्र हरपलेला सूरज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आला आहे. सूरजच्या आत्याने व बहिणींनी त्याचा सांभाळ करत त्याला लहानाचा मोठा केला आहे. परिस्थितीमुळे सूरज त्याचे शिक्षणही घेऊ शकला नाही. त्यामुळे व्यवहार ज्ञानापासून तो फार दूर आहे.

आणखी वाचा – Video : मलायका अरोराच्या लेकाचं सावत्र आईवरही जीवापाड प्रेम, एकत्र क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

अशातच सूरजने नुकतीच वसेवाडी जवळच्या एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांची भेट घेतली. सूरजला पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमा झाले होते. सूरजची एन्ट्री होताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सूरज सूरज अशी हाक देण्याबरोबरचं टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी सूरजचं स्वागत केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. यावेळी सूरजने सर्व मुलांना लाखमोलाचा सल्ला देत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्याच्या लग्नात कलाकारांची रंगली संगीत मैफिल, पियुष रानडेच्या गाण्याला उपस्थितांची दाद, व्हिडीओ व्हायरल

सूरजच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सूरज विद्यार्थ्यांना सल्ला देताना दिसतोय. यावेळी सूरज असं बोलताना दिसत आहे की, “काय मग बरंय ना? चांगलं शिकताय, अजून मोठं व्हायचंय. खूप शिक्षण घ्या. मला जमलं नाही शिक्षण घ्यायला पण, तुम्ही असं करु नका, खूप शिक्षण घ्या. खूप मोठे व्हा. मी कसा ‘बिग बॉस किंग’ झालो ‘झापुक झुपूक’ करुन तसे तुम्ही पण पुढे जा पण, शिक्षण घेऊन मोठे व्हा”. सूरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Tags: bigg boss marathi season 5Suraj ChavanSuraj Chavan Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Abhishek Gaonkar Wedding

समुद्रकिनारी सोनाली व अभिषेक गावकरचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, शाही लग्नसोहळ्याची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.