Rekha Affair : कमल हासन हे भारतातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. भारतीय सिनेमाविश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असूनही, कमल हासन यांचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच वादग्रस्त राहिले. कमल हासन यांच्या अनेक लिंकअप दरम्यान, रेखा यांच्या अफवांनी हवा केली. रेखा आणि कमल यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. १९८१ मध्ये, जेव्हा रेखा यश चोप्राच्या सिलसिलाच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा तिने तमिळ चित्रपट मिंडम कोकिलासाठी साइन केले होते. कमल हासन आणि श्रीदेवीही या चित्रपटात होते.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, रेखा आणि कमल यांच्यात रोमान्सची चर्चा असल्याची सुरुवात झाली होती आणि सेटवर कोणालाही याबद्दल माहिती नव्हते.मात्र एकेदिवशी कमल हासन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी वाणी गणपति यांच्यापर्यंत ही चर्चा पोहोचली.मीडिया रिपोर्टनुसार, रेखा ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याठिकाणी वाणी पोहोचल्या. त्यांनी कमल हासन यांच्यासह अभिनेत्रीला रंगेहात पकडले होते. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील पाहुण्यांसमोर गोंधळही घातला. काहीच आठवड्यांनी रेखा यांना त्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यांच्या जागी मल्याळम अभिनेत्री दीपा (उन्नी मेरी) यांना काम देण्यात आले.
आणखी वाचा – ‘ती’ परत आली! आई झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच अभिनेत्री कामावर परतली, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
रेखाबरोबरचा हा प्रसंग घडल्यानंतर काही वर्षांनी वाणी आणि कमल यांचे नाते बिनसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर १९८४ साली ‘राज तिलक’ सिनेमाच्या सेटवर कमल आणि अभिनेत्री सारिका यांचे सूत जुळले. कमल आणि वाणी यांच्या आयुष्यात सारिका या तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.
कमल हासन विवाहित असल्याने त्यांचे सारिकाबरोबरचे नाते अनेकदा मोडण्याच्या मार्गावर होते, मात्र त्यादरम्यान सारिका गर्भवती असल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचली आणि खळबळ उडाली होती. त्यामुळे १९८८ साली कमल आणि वाणी विभक्त झाले, त्याच वर्षी अभिनेत्याने सारिका यांच्याशी लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली आहे. सारिकाबरोबरचे त्यांचे नातेही दीर्घकाळ टिकू शकले नाही, त्यांनी २००४ साली घटस्फोट घेतला.