शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महेश मांजरेकरांनी माझं पात्रच सिनेमातून काढलं”, क्रांती रेडकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, ” त्याचं दु:ख…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar On Mahesh Manjrekar

"महेश मांजरेकरांनी माझं पात्रच सिनेमातून काढलं", क्रांती रेडकरने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, " त्याचं दु:ख…"

Kranti Redkar On Mahesh Manjrekar : सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर अनेक मराठी चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते. अनेक हटके व्हिडीओ शेअर करत ती तिचे अपडेट चाहत्यांना देत असते. क्रांतीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मध्यंतरीच्या काळात क्रांती सिनेविश्वपासून दूर होती मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या क्रांती सिनेविश्वपासून दूर असली तरी यापूर्वी तिने अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या काळातील एका दिग्दर्शकाचा किस्सा सांगितला आहे.

क्रांतीने सांगितलेला हा किस्सा महेश मांजरेकर यांचा आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘लालबाग परळ’ या चित्रपटात क्रांतीचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण ऐनवेळी महेश मांजरेकरांनी ती भूमिकाच सिनेमातून काढून टाकली, याबाबत क्रांतीने नुकत्याच दिलेल्या मिरची मराठी या पॉडकास्टमध्ये सांगितलं. क्रांतीनं आता पर्यंत केदार शिंदे , महेश मांजरेकर अशा दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, पण अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव, यांच्याकडून काय शिकलीस?, असं क्रांतीला मुलाखतीत विचारण्यात आलं.

आणखी वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याचा साधेपणात साखरपुडा, होणाऱ्या बायकोसह व्हिडीओ शेअर करत दिलं सरप्राइज, Video व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

या प्रश्नाचं उत्तर देत क्रांती म्हणाली, “महेश मांजरेकर हे दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेत. त्यांच्या सिनेमात काम केल्यानंतर कलाकार म्हणून तुम्हाला खूप काय शिकायला मिळतं. मी त्यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता,तो म्हणजे लालबाग परळ. या सिनेमात मी होते पण नंतर त्यांनी माझा पूर्ण रोल कापला. त्यांनी माझं पात्रच सिनेमातून काढून टाकलं होतं. ते म्हणाले की, आता मी पाचपैकी एक सीन कापेन. आणखी एक सीन कापला जाईल. फक्त तीन सीनसाठी मला तुला वाया घालवायचं नाही. त्यामुळं मी तुझी भूमिकाच सिनेमातून काढतोय”.

आणखी वाचा – “तुमचंही वय होईल, तुम्हालाही मरण…”, मरण, वयावरुन डिवचणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचं उत्तर, हटके रिप्लाय

क्रांती म्हणाली, “महेश मांजरेकरांनी सिनेमातून रोल कापल्यानंतर त्याचं दु:ख वाटलं नाही, कारण मला त्यातून बरंच काही शिकायला मिळालं होतं, असं क्रांतीनं म्हटलं. तसंच क्रांती महेश मांजरेकरांना म्हणाली की, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण या चित्रपटात काम करणं माझ्यासाठी अभिनयाचं आणखी प्रशिक्षण घेण्यासारखंच होतं. खूप काही शिकायला मिळालं. ते देखील अगदी मोफत. उलट शिकायचे मला पैसे मिळाले. मांजरेकरांनी रोल सिनेमात व्यवस्थित बसत नसल्याने तो कापला. या गोष्टीचा सकारात्मक दृष्टीनं मी विचार केला”.

Tags: entertainmentkranti redkarmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Tharla Tar Mag

'ती' परत आली! आई झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच अभिनेत्री कामावर परतली, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.