बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रेखाबरोबर अफेअर, पत्नीने रंगेहात पकडलं आणि…; सिनेसृष्टीतील ‘या’ अभिनेत्याचा झालाय दोनदा घटस्फोट, सिनेमाच्या सेटवर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2025 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
usha nadkarni

रेखाबरोबर अफेअर, पत्नीने रंगेहात पकडलं आणि…; सिनेसृष्टीतील या अभिनेत्याचा झालाय दोनदा घटस्फोट, सिनेमाच्या सेटवर…

Rekha Affair : कमल हासन हे भारतातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. भारतीय सिनेमाविश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असूनही, कमल हासन यांचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच वादग्रस्त राहिले. कमल हासन यांच्या अनेक लिंकअप दरम्यान, रेखा यांच्या अफवांनी हवा केली. रेखा आणि कमल यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. १९८१ मध्ये, जेव्हा रेखा यश चोप्राच्या सिलसिलाच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा तिने तमिळ चित्रपट मिंडम कोकिलासाठी साइन केले होते. कमल हासन आणि श्रीदेवीही या चित्रपटात होते.

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, रेखा आणि कमल यांच्यात रोमान्सची चर्चा असल्याची सुरुवात झाली होती आणि सेटवर कोणालाही याबद्दल माहिती नव्हते.मात्र एकेदिवशी कमल हासन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी वाणी गणपति यांच्यापर्यंत ही चर्चा पोहोचली.मीडिया रिपोर्टनुसार, रेखा ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याठिकाणी वाणी पोहोचल्या. त्यांनी कमल हासन यांच्यासह अभिनेत्रीला रंगेहात पकडले होते. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील पाहुण्यांसमोर गोंधळही घातला. काहीच आठवड्यांनी रेखा यांना त्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यांच्या जागी मल्याळम अभिनेत्री दीपा (उन्नी मेरी) यांना काम देण्यात आले.

आणखी वाचा – ‘ती’ परत आली! आई झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच अभिनेत्री कामावर परतली, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

रेखाबरोबरचा हा प्रसंग घडल्यानंतर काही वर्षांनी वाणी आणि कमल यांचे नाते बिनसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर १९८४ साली ‘राज तिलक’ सिनेमाच्या सेटवर कमल आणि अभिनेत्री सारिका यांचे सूत जुळले. कमल आणि वाणी यांच्या आयुष्यात सारिका या तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.

आणखी वाचा – “महेश मांजरेकरांनी माझं पात्रच सिनेमातून काढलं”, क्रांती रेडकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, ” त्याचं दु:ख…”

कमल हासन विवाहित असल्याने त्यांचे सारिकाबरोबरचे नाते अनेकदा मोडण्याच्या मार्गावर होते, मात्र त्यादरम्यान सारिका गर्भवती असल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचली आणि खळबळ उडाली होती. त्यामुळे १९८८ साली कमल आणि वाणी विभक्त झाले, त्याच वर्षी अभिनेत्याने सारिका यांच्याशी लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली आहे. सारिकाबरोबरचे त्यांचे नातेही दीर्घकाळ टिकू शकले नाही, त्यांनी २००४ साली घटस्फोट घेतला.

Tags: bollywood gossipentertainmentRekha Affair
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
reshma shinde vat purnima

पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.