बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2025 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
reshma shinde vat purnima

पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्...; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

reshma shinde vat purnima : आज सर्वत्र वटपौर्णिमेचा सण महिलावर्ग साजरा करताना दिसत आहेत. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. तर मराठी सिनेविश्वातील नवीन लग्न झालेल्या अभिनेत्रीसुद्धा वटपौर्णिमेचं व्रत आवर्जून करताना दिसतात. कामाच्या, शूटिंगच्या वेळातून वेळ काढत या अभिनेत्री आपल्या आयुष्यभराच्या साथीदारासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करतात. हल्ली अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या. यांत मालिकाविश्वातील अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. रेश्मा शिंदेने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीनं शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करत सुखद धक्का दिला.

अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही लग्नानंतरची तिची पहिली वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली. वटपौर्णिमेचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरीच तिच्या पतीसह वटपौर्णिमा साजरी केली आहे. ल्गनांतरचा प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करताना दिसते. रेश्माचा नवरा हा साऊथ इंडियन असूनही त्याने पत्नीला साथ देत अगदी मराठमोळ्या अंदाजात ही वटपौर्णिमा साजरी केली आहे.

आणखी वाचा – “महेश मांजरेकरांनी माझं पात्रच सिनेमातून काढलं”, क्रांती रेडकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, ” त्याचं दु:ख…”

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

रेश्माने शेअर केलेल्या वटपौर्णिमा स्पेशल व्हिडीओमध्ये पवन, रेश्माच्या गळयात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. त्यानंतर रेश्मा नाकात नथ घालताना दिसतेय. रेश्माने वटपौर्णिमेसाठी खास पोपटी रंगाची पैठणी नेसली आहे. व्हिडीओमध्ये रेश्माचा नवरा तिच्या साडीच्या निऱ्या सरळ करताना दिसतोय. आणि त्यांनतर रेश्मा व पवन दोघे मिळून वटसावित्रीची पूजा करत आहेत. रेश्माने हा व्हिडीओ शेअर करत, “माझी पहिली वटपौर्णिमा” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – रेखाबरोबर अफेअर, पत्नीने रंगेहात पकडलं आणि…; सिनेसृष्टीतील ‘या’ अभिनेत्याचा झालाय दोनदा घटस्फोट, सिनेमाच्या सेटवर…

२९ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी रेश्मा विवाहबंधनात अडकली. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रेश्माच्या पतीचं नाव पवन असं आहे. पवन आयटी इंडस्ट्रीत काम करतो. गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो युकेत होता. पण आता तो भारतात परतला आहे.

Tags: entertainmentmarathi actressreshma shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Vat Purnima 2025

“तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?”, वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन अंकितावर भडकली चाहती, दिलं सडेतोड उत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.