‘दंगल’ या चित्रपटाने अभिनेत्री जायरा वसिम ही अधिक चर्चेत असते. यामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुकदेखील केले गेले. त्यानंतर ती अमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटामध्येही दिसून आली होती. यामध्ये तिच्या जिद्दी मुलीच्या भूमिकेला खूप प्रेम मिळाले. जायरा सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आशातच आता तिची आता एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र खळबळदेखील उडाली आहे. (zaira wasim social media post)
जायराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्थानिक दुकानातून खरेदी करताना दोनदा विचार करा असे सांगितले आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. श्रीनगरमधील एका दुकानातून पाई खरेदी केला. पण याला बुरशी लागलेलीदेखील दिसून आली. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले कि, “स्थानिक दुकानातून काहीही खरेदी करताना दोनदा तपासा”.

जायराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘दंगल’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यामध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. यासाठी तिला लोकप्रिय सहाय्यक अभिनेत्रीकहा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच ती प्रियंका चोप्राबरोबर ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्येही दिसून आली होती. जायराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तिची एक मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ती म्हणाली की, “पुरस्कार मिळाल्यानंतर वडिलांना पुरस्काराचे महत्त्व माहीत नव्हते. त्यांना याबद्दल समजावण्यासाठी तब्बल दोन तास गेले. मात्र नंतर माझ्या आई-वडिलांना माझ्याबद्दल गर्व वाटला होता”.
२०१९ साली तिने चित्रपटसृष्टीला राम राम केला. तिने धर्माचे पालन करण्यासाठी कलाविश्वापासून दूर जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तिच्या या निर्णयाने चित्रपटसृष्टीसहित तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.