Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा सुरु झाला असून या तिसऱ्या आठवड्याची सुरुवातच भांडणांनी झाली आहे. या भांडणात निक्कीने सुरुवात केली आहे. निक्कीच बाहेर असलेल्या सामानाला हात लावायचा नाही असं ती आधीपासून सांगत असताना पॅडीने साफसफाई करताना तिच्या सामानाला हात लावला. हे पाहून निक्की पॅडीवर भडकली. यावेळी निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवरही भडकलेली दिसली. तिच्या खासगी वस्तूंना हात लावल्यामुळे तिने त्रागा केला.
यावेळी निक्की पॅडीला म्हणाली, “माझ्या वस्तुंना का हात लावला?”. त्यावर पॅडी म्हणाला,”माझी ड्युटी करतोय”. यावर उत्तर देत निक्की म्हणते, “मला कामं करायची आहेत, समजलं ना”. त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते. यावर पॅडीही रागाने निक्कीला म्हणतो, “माझ्या कपड्यांना हात लावू नकोस”. असं म्हणत त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी घराची कॅप्टन अंकिता वालावलकरलाही मध्ये पडल्याने निक्कीने ढकलून दिलं.
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
आजच्या भागामध्ये निक्की व पॅडी कांबळे यांच्यात झालेल्या वादानंतर वैभवमध्ये पडतो. वैभव पॅडी दादांशी बोलायला येतो आणि म्हणतो की, “तिचं सामान आहे ती हात लावेल. मी हात लावणार नाही, तुम्ही हात लावणार नाही इतकं साधं आहे. तुम्ही सांगणं तुमचं काम आहे. तुम्ही चांगले व्हाल. जर तुम्ही दहावेळा सांगितलं असतं तर तुमच्या संयमाच कौतुक झालं असतं”. यावर पॅडी वैभवला म्हणतो, “पण मी संयम सोडलाच नाही आहे.मी तिचं सामान टाकलेलं नाही आहे”.
यावर वैभव अरेरावी करत असं म्हणतो की, “तुम्ही तिच्या सामानाला हात लावून किडे केले आहेत. बाकी काही नाही आहे”. यावर पॅडी वैभवला बोलतो, “अरे सामान एकपण तिचं पडलं नाही. आणि असं काहीच नाही आहे”. तर आतमध्ये निक्की सर्वांना सांगते की, “मी १०० दिवस सामान तिथेच ठेवणार आहे. तरी यांना त्रास होत आहे. अजून किती खरं बोलू”. आता निक्कीच वागणं अनेकांना खटकलेलं दिसत आहे.