सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराचे प्रमाण खूप वाढत आहे. AI चे अनेक फायदे असून तोटेदेखील अधिक आहेत.मात्र आजवर अनेक कलाकारांना AI चा फटका बसला आहे. आशातचा आता किंग खान म्हणजेच शाहरुख खानला AI चा फटका बसला आहे. शाहरुखचे गौरीबरोबरचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये शाहरुख, गौरी व आर्यन हे मक्का येथे दिसून येत आहेत. तसेच हे फोटो शेअर करत शाहरुखने लग्नाच्या ३३ वर्षानंतर गौरीला धर्म बदलायला भाग पाडलं असंही म्हंटलं आहे. त्यामुळे हे फोटो बघून सगळ्यांनाच खूप आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र या फोटोंमागाचं नक्की सत्य काय आहे? हे जाणून घेऊया. (shahrukh khan- gauri khan viral photos)
सोशल मीडियावर शाहरुखचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये आर्यनही दिसत आहे. हे फोटो मक्का येथे काढले आहेत. मात्र हे फोटो ai च्या माध्यमातून तयार केले असून खरे नसल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख व गौरी यांनी नेहमीच एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करतात. त्यांच्या घरी गणपती, ईद असे हिंदु व मुस्लिम सण साजरे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये धर्मावरुन आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे वादही झालेले नाहीत.
शाहरुख व गौरी यांच्या मुलांनादेखील ते प्रत्येक धर्माची शिकवण देताना दिसतात. गौरीवर शाहरुखने कधीही धर्म बदलण्याची जबरदस्ती केली नाही. तसेच ते दोघंही एकमेकांवर आजही खूप प्रेम करताना दिसतात. त्यामुळे व्हायरल झालेल्या फोटोंना काहीही अर्थ नसल्याचे सगळ्यांनी म्हंटले आहे. गेल्या काही वर्षांपासून शाहरुख व गौरी यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा भाष्य केले आहे.
दरम्यान ‘कॉफी विथ करण’ च्या एका एपिसोडमध्ये गौरी म्हणाली होती की, “शाहरुखने कधीही मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट ठेवली नव्हती. त्याच्या धर्माचा मी खूप आदर करते”. शाहरुख व गौरी यांनी २५ ऑक्टोबर १९९१ साली थाटामाटात लग्न केले. त्यांना आर्यन, सुहाना व अबराम अशी तीन मुलं आहेत. तिघंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली बघायला मिळतात.