Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’ सध्या चर्चेत आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. हे सीझन सुरु झालं तेव्हापासून या सीझनची सर्वत्र चर्चा सुरु होती. यावेळी अनेक दिग्गज स्पर्धकांनी या शोमध्ये येऊन सर्वांचं भरपूर मनोरंजन केलं. हा शो आता हळूहळू अंतिम टप्प्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात विवियन डिसेना, करण वीर मेहरा, ईशा आणि एलिससारखे लोकप्रिय टीव्ही कलाकार दिसले. तर चाहत पांडे, अविनाश मिश्रा सारख्या स्टार्सनी या शोमुळे विशेष प्रसिद्धी मिळवली. आता या शोचा विजेता कोण होणार याविषयी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
प्रत्येकाला आपला आवडता स्पर्धक जिंकलेला पाहायचा असतो. आता Ormax Media चे रेटिंग आले आहे, त्यात टॉप ५ स्पर्धकांची नावे आहेत. ओरमॅक्स मीडियाच्या रेटिंगनुसार रजत दलाल पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. हे रेटिंग २८ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आहेत. रजत दलाल टॉप १० च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. करवनीर मेहरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिल्पा शिरोडकर चौथ्या क्रमांकावर तर चाहत पांडे पाचव्या क्रमांकावर आहे.
याआधीच्या आठवड्याच्या (२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर) रँकिंगमध्ये रजत दलाल पहिल्या क्रमांकावर, विवियन दुसऱ्या, करणवीर मेहरा तिसऱ्या, शिल्पा शिरोडकर चौथ्या आणि अविनाश मिश्रा पाचव्या क्रमांकावर होते. या शोचा विजेता कोण असेल याबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. पण रजत दलाल ज्या प्रकारे नंबर एकवर राहिला आहे आणि चाहते त्याला प्रेम देत आहेत. यावरुन चाहत्यांना नक्कीच तो विजेता बनलेला पाहायचा आहे.
या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच फॅमिली वीक पार पडला. यावेळी सर्वजण भावूक झाले होते. अभिनेत्री चाहत पांडेच्या आईची खूप चर्चा झाली. ती खूप स्पष्टपणे बोलताना दिसली. सलमान खानने अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांची चांगलीच शाळा घेतली. त्याने अविनाश मिश्रा यांना मुलगी-मुलगाही संबोधले.