‘बिग बॉस‘च्या १७ व्या पर्वाची सुरुवातच धमाकेदार अंदाजात झाली आहे. अलीकडेच या शोमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार वादावादी पाहायला मिळाली. आताच्या भागात तहलका व अभिषेक कुमार यांच्यात बरीच बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. आता या आठवड्यात भांडणांमुळे सनी आर्या उर्फ तहलकाला याला शोमधून काढून टाकण्यात आलं असल्याचं समोर येत आहे. यावर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली असून सध्या तिची ही प्रतिक्रिया बरीच व्हायरल होताना दिसते. (Sunny tehelka wife deepika first reaction)
तिने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिचं मत व्यक्त केलं. या व्हिडीओत तिने शोमध्ये झालेल्या भांडणामुळे सनी आर्याला घरातून बाहेर काढलं जाण्यावर प्रतिक्रिया दिली, ती सांगते, “सनीला घरातून बाहेर काढण्यात आलं असल्याची बातमी बातमी बघितली. कारण हे सांगण्यात आलं की त्याने मारामारी केली. मी हे स्पष्ट करू इच्छिते की, त्याने मारामारी केलीच नाही. मी जेवढ्या काही क्लीप्स बघितल्या त्यावरून त्याने कोणाचा गळा पकडलेला नाही हे स्पष्ट होतं. त्याने फक्त शर्ट पकडलं होतं. जर कोण आपल्याला भडकवत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर नक्कीच व्यक्त होऊ शकते. असं नाही की ‘बिग बॉस’च्या घरात कोण असं वागत नाही. जर तो असा वागलाच आहे तर तो त्याच्या मैत्रीसाठी वागला आहे”, असं तिने सांगितलं.
सनी आर्या व अभिषेक कुमार सुरुवातीपासूनच एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत. दोघांमध्ये बऱ्याचदा मारामारीही झाली. एका भांडणाच्या वेळी अभिषेकला ‘बिग बॉस’ने कोणालाही दोष देऊ नको असा इशारा दिला होता. गेल्या ‘वीकेंड वार’मध्ये सनीने एका टास्कदरम्यान सलमान खानसमोर अभिषेक कुमारवर चुकीच्या पद्धतीने राग व्यक्त केला होता. त्यावेळी सनी आर्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर सलमानला खूप राग आला.
या आठवड्यात ‘वीकेंड वार’ सलमनान खान नाही तर करण जोहर होस्ट करणार आहे. शोच्या प्रोमोवरुन, करण अभिषेक कुमारला त्याच्या वागण्याबद्दल फटकारताना दिसत आहे. करणच्या बोलण्यामुळे अभिषेकला अपमान झाल्यासारखा वाटतो. यावेळी तो रडतानाही दिसला. करण जोहर यात इतर स्पर्धकांबद्दलही बोलताना दिसला. अंकिता लोखंडे-मुनावर फारूकी व मन्नारा चोप्रा यांच्या मैत्रीवर प्रतिक्रिया देताना दिसला.