गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मारामारी केलीच नाही तरीही…”, सनी आर्याला ‘बिग बॉस १७’च्या घरातून बाहेर काढल्यानंतर बायको भडकली, म्हणाली, “मी जे बघितलं त्यावरुन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 1, 2023 | 5:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunny tehelka wife deepika first reaction

Sunny tehelka wife deepika first reaction

‘बिग बॉस‘च्या १७ व्या पर्वाची सुरुवातच धमाकेदार अंदाजात झाली आहे. अलीकडेच या शोमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार वादावादी पाहायला मिळाली. आताच्या भागात तहलका व अभिषेक कुमार यांच्यात बरीच बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. आता या आठवड्यात भांडणांमुळे सनी आर्या उर्फ तहलकाला याला शोमधून काढून टाकण्यात आलं असल्याचं समोर येत आहे. यावर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली असून सध्या तिची ही प्रतिक्रिया बरीच व्हायरल होताना दिसते. (Sunny tehelka wife deepika first reaction)

तिने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिचं मत व्यक्त केलं. या व्हिडीओत तिने शोमध्ये झालेल्या भांडणामुळे सनी आर्याला घरातून बाहेर काढलं जाण्यावर प्रतिक्रिया दिली, ती सांगते, “सनीला घरातून बाहेर काढण्यात आलं असल्याची बातमी बातमी बघितली. कारण हे सांगण्यात आलं की त्याने मारामारी केली. मी हे स्पष्ट करू इच्छिते की, त्याने मारामारी केलीच नाही. मी जेवढ्या काही क्लीप्स बघितल्या त्यावरून त्याने कोणाचा गळा पकडलेला नाही हे स्पष्ट होतं. त्याने फक्त शर्ट पकडलं होतं. जर कोण आपल्याला भडकवत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर नक्कीच व्यक्त होऊ शकते. असं नाही की ‘बिग बॉस’च्या घरात कोण असं वागत नाही. जर तो असा वागलाच आहे तर तो त्याच्या मैत्रीसाठी वागला आहे”, असं तिने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Deepika Arya (@deepika_aryaa)

आणखी वाचा – “दारुच्या नशेत तिने मला…”, पार्टीमध्ये ‘दंगल’ फेम फातिमा शेखबरोबर बरोबर घडला धक्कादायक प्रकार, म्हणाली, “उद्धट होती आणि…”

सनी आर्या व अभिषेक कुमार सुरुवातीपासूनच एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत. दोघांमध्ये बऱ्याचदा मारामारीही झाली. एका भांडणाच्या वेळी अभिषेकला ‘बिग बॉस’ने कोणालाही दोष देऊ नको असा इशारा दिला होता. गेल्या ‘वीकेंड वार’मध्ये सनीने एका टास्कदरम्यान सलमान खानसमोर अभिषेक कुमारवर चुकीच्या पद्धतीने राग व्यक्त केला होता. त्यावेळी सनी आर्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर सलमानला खूप राग आला.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांनी नातवाला झोपवण्यासाठी लढवली शक्कल, अंगाईही गायली अन्…; गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या आठवड्यात ‘वीकेंड वार’ सलमनान खान नाही तर करण जोहर होस्ट करणार आहे. शोच्या प्रोमोवरुन, करण अभिषेक कुमारला त्याच्या वागण्याबद्दल फटकारताना दिसत आहे. करणच्या बोलण्यामुळे अभिषेकला अपमान झाल्यासारखा वाटतो. यावेळी तो रडतानाही दिसला. करण जोहर यात इतर स्पर्धकांबद्दलही बोलताना दिसला. अंकिता लोखंडे-मुनावर फारूकी व मन्नारा चोप्रा यांच्या मैत्रीवर प्रतिक्रिया देताना दिसला.

Tags: bigg boss 17Sunny arya aka tehelkawife deepika
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Rinku Rajguru On Jhimma 2

“मी नवीन आहे असं मला…”, ‘झिम्मा २’मध्ये काम करण्यावरुन रिंकू राजगुरुचं वक्तव्य, म्हणाली, “सगळ्यांनी अलगदपणे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.