शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तरुण मुलगी आहे, शॉर्ट्समध्ये वावरते…”, गोविंदापासून दूर राहण्याचा पत्नीने केला खुलासा, म्हणाली, “या जगात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 1, 2025 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunita Ahuja Reveals Real Reason Of Divorce

"तरुण मुलगी आहे, शॉर्ट्समध्ये वावरते…", गोविंदापासून दूर राहण्याचा पत्नीने केला खुलासा, म्हणाली, "या जगात…"

Sunita Ahuja Reveals Real Reason Of Divorce : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या विशेष चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी अनेकांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय नेमका कशासाठी असे अनेक प्रश्न साऱ्यांना सतावत राहिले. मात्र अद्याप चाहत्यांच्या या प्रश्नांचे योग्य असे उत्तर दोघांकडून मिळालेले नाही. परंतु गोविंदाच्या वकिलाने सांगितले की, सुनिताने सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती, परंतु आता त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. दरम्यान, सुनीताच्या जुन्या मुलाखतीने या चर्चांना उधाण आले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्यामध्ये ती असं म्हणाली होती की, ती तिच्या मुलांसह आणि गोविंदाशिवाय दुसर्‍या घरात राहत आहे.

यानंतर आता दुसरा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये सुनीता म्हणाली की, कोणीही तिला गोविंदापासून वेगळे करु शकत नाही. ती गोविंदापेक्षा वेगळी का राहते हे देखील सांगितले. सुनिता अहजाने ‘हिंदी रश’ ला एका मुलाखतीत सांगितले होते की ती आणि गोविंदा गेल्या १२ वर्षांपासून स्वतंत्र घरात राहत आहेत. शिवाय, ती १२ वर्षांपासून तिचा वाढदिवस एकटाच साजरा करीत आहे. यानंतर, सुनिता आहुजा आणि गोविंदा घटस्फोट घेणार आहेत या चर्चेला वेग आला. पण आता सुनीताने गोविंदापासून दूर राहण्याचे खरे कारण उघड केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, सुनिता म्हणत आहे, “जेव्हा आम्ही स्वतंत्रपणे राहायला लागलो तेव्हा त्यांना राजकारणात सामील व्हायचे होते आणि माझी मुलगी तरुण होत होती. तर सर्व कामगार घरी यायचे. आता एक तरुण मुलगी आहे, मी आहे, आम्ही घरात शॉर्ट्स घालतो आणि फिरतो, म्हणून आम्ही घराच्या समोर ऑफिस घेतलं. पण मला आणि गोविंदाला या जगात कोण वेगळं करु शकतं त्याने माझ्यासमोर यावं”.

आणखी वाचा – कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा होणार, गरोदर असल्याचं सांगत शेअर केला फोटो, जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Ssunita Ahuja (@sunita.ahuja.7583)

१९८७ मध्ये गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी लग्न केले. १९८८ मध्ये ते त्यांची मुलगी टीनाचे पालक बनले आणि त्यांना यशवर्धन हा मुलगा देखील आहे, जो लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे. घटस्फोटाच्या वृत्तावर, गोविंदाच्या वकिलाने अलीकडेच असा दावा केला की, अभिनेता आणि त्यांची पत्नी संपूर्ण कुटुंबासमवेत नेपाळ पशुपतिनाथ मंदिरात भेट देण्यास गेले होते. पण हा दावा खोटा ठरला.

आणखी वाचा – Video : कौतुकास्पद! विकी कौशलने सादर केली मराठीत कविता, स्पष्ट उच्चार ऐकून उपस्थितही भारावले, व्हिडीओ एकदा पाहाच

कुटुंबाच्या जवळच्या एका स्त्रोताने सांगितले की, सुनीता एकटीच नेपाळला गेली होती आणि तिच्याबरोबर मुलगी टीना होती. त्याच वेळी, गोविंदा आपला वकील आणि मित्राबरोबर गेला होता. सुनीताला माहित नव्हते की गोविंदा तिथेही होता. दोघेही स्वतंत्र हॉटेलमध्ये राहिले.

Tags: bollywood newssunita AhujaSunita Ahuja Reveals Real Reason Of Divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Oscar 2025

Oscar 2025 : भारतात कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार ऑस्कर पुरस्कार सोहळा, तारीख, वेळ जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.