Sunita Ahuja Reveals Real Reason Of Divorce : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या विशेष चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी अनेकांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय नेमका कशासाठी असे अनेक प्रश्न साऱ्यांना सतावत राहिले. मात्र अद्याप चाहत्यांच्या या प्रश्नांचे योग्य असे उत्तर दोघांकडून मिळालेले नाही. परंतु गोविंदाच्या वकिलाने सांगितले की, सुनिताने सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती, परंतु आता त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. दरम्यान, सुनीताच्या जुन्या मुलाखतीने या चर्चांना उधाण आले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्यामध्ये ती असं म्हणाली होती की, ती तिच्या मुलांसह आणि गोविंदाशिवाय दुसर्या घरात राहत आहे.
यानंतर आता दुसरा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये सुनीता म्हणाली की, कोणीही तिला गोविंदापासून वेगळे करु शकत नाही. ती गोविंदापेक्षा वेगळी का राहते हे देखील सांगितले. सुनिता अहजाने ‘हिंदी रश’ ला एका मुलाखतीत सांगितले होते की ती आणि गोविंदा गेल्या १२ वर्षांपासून स्वतंत्र घरात राहत आहेत. शिवाय, ती १२ वर्षांपासून तिचा वाढदिवस एकटाच साजरा करीत आहे. यानंतर, सुनिता आहुजा आणि गोविंदा घटस्फोट घेणार आहेत या चर्चेला वेग आला. पण आता सुनीताने गोविंदापासून दूर राहण्याचे खरे कारण उघड केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, सुनिता म्हणत आहे, “जेव्हा आम्ही स्वतंत्रपणे राहायला लागलो तेव्हा त्यांना राजकारणात सामील व्हायचे होते आणि माझी मुलगी तरुण होत होती. तर सर्व कामगार घरी यायचे. आता एक तरुण मुलगी आहे, मी आहे, आम्ही घरात शॉर्ट्स घालतो आणि फिरतो, म्हणून आम्ही घराच्या समोर ऑफिस घेतलं. पण मला आणि गोविंदाला या जगात कोण वेगळं करु शकतं त्याने माझ्यासमोर यावं”.
१९८७ मध्ये गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी लग्न केले. १९८८ मध्ये ते त्यांची मुलगी टीनाचे पालक बनले आणि त्यांना यशवर्धन हा मुलगा देखील आहे, जो लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे. घटस्फोटाच्या वृत्तावर, गोविंदाच्या वकिलाने अलीकडेच असा दावा केला की, अभिनेता आणि त्यांची पत्नी संपूर्ण कुटुंबासमवेत नेपाळ पशुपतिनाथ मंदिरात भेट देण्यास गेले होते. पण हा दावा खोटा ठरला.
कुटुंबाच्या जवळच्या एका स्त्रोताने सांगितले की, सुनीता एकटीच नेपाळला गेली होती आणि तिच्याबरोबर मुलगी टीना होती. त्याच वेळी, गोविंदा आपला वकील आणि मित्राबरोबर गेला होता. सुनीताला माहित नव्हते की गोविंदा तिथेही होता. दोघेही स्वतंत्र हॉटेलमध्ये राहिले.