Kiara Advani And Siddharth Malhotra Shared Goodnews :बॉलिवूड सिनेविश्वातून एकामागोमाग एक आनंदाच्या बातम्या येत आहेत. अशातच एका कलाकार जोडीने दिलेल्या आनंदाच्या बातमीने अनेकांच्या नजरा वळविल्या आहेत. आणि ही कलाकार जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. कियारा व सिद्दार्थ यांनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. या गुयडन्यूजने अनेकांच्या नजरा वळल्या असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांना बाळ होणार असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही बातमी पोस्ट करुन त्यांनी साऱ्यांना गोड सरप्राईज दिलं आहे.
सिद्धार्थ व कियारा यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. “आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे”, असं खास कॅप्शन देत त्यांनी चिमुकल्या बाळाचे मोजे हातात घेत फोटो पोस्ट केला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी आई-बाबा व्हायचा निर्णय घेतला आणि अखेर आता हे जोडपे त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. बाळ होणार असल्याची गुडन्यूज देताच त्यांच्या चाहतेमंडळींकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ मधील अतरंगी मित्रांची ओळख, संचिताचा बॉसी स्वभाव भारी पडणार की मैत्री होणार?
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. सिद्धार्थ आणि कियारा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. बरेचदा कियारा व सिद्धार्थ एकत्र स्पॉट होताना दिसतात. आता आनंदाची बातमी दिल्यानंतर त्यांचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये कियाराने सांगितलं होतं की, दोघांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅप अप पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली.
‘शेरशाह’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर कियारा व सिद्धार्थ बरेचदा एकत्र दिसू लागले. आणि यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा या समोर येऊ लागल्या. २०२२ मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सिद्धार्थ आणि कियारा मालदीवमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.