प्रत्येक मालिकेचा असा खास चाहतावर्ग असतो. ती मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक त्या मालिकेच्या कथानकावर, कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. नवनव्या मालिका आल्या तरी आधीपासून सुरु असलेल्या मालिकांच्या प्रेमात हे प्रेक्षकवर्ग कायम असतात. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर कस्तुरी ही नवी मालिका पुढील महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. २६ जून पासून ही मलिका ऑन एअर जाणार असून या मालिकेची वेळ रात्री १०.३० वाजताची ठेवण्यात आली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.(Sundara Manamadhye Bharli Update)
मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोला प्रेक्षकांनी पाहताच क्षणी त्याखाली कमेंट करत प्रेक्षकांनी वेगळाच प्रश्न उपस्थित केलाय. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय, या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग ही आहे. ही मालिका सध्या रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते.
पाहा ही मालिका का घेणार प्रेक्षकांचा निरोप? (Sundara Manamadhye Bharli Update)
यावरून आता आलेल्या कस्तुरी मालिकेची वेळही रात्री १०.३०ची ठेवण्यात आली आहे हे पाहून प्रेक्षकांनी सुंदर मनामध्ये भरली या मालिकेचं काय? सुंदरा मनामध्ये भरली मालिका नका बंद करू अशा कमेंट केल्या आहेत. आता सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका संपणार का ? की मालिकेची वेळ बदलणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नक्की काय होणार हे जाणून घेणं अर्थात रंजक ठरेल.(Sundara Manamadhye Bharli Update)
हे देखील वाचा – ‘मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची २ कारणे होती’ – गार्गी फुले
कस्तुरी मालिका येण्याची घोषणा होताच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजगी दर्शविली आहे. आजवर सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. मालिकेतील लतिका हे पात्र रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतंय.
