राजा राणीची ग जोडी या मालिकेतून घराघरात पोहचलेली आणि निळू फुले यांची मुलगी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गार्गी फुले हिने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. ज्येष्ठ सिनेअभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले हिने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. गार्गी फुले यांच्या निमित्ताने आणखी एका सिनेअभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केलेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गार्गी फुले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.(Gargi Phule Joined NCP)
गार्गी फुले यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऑफर चालून आली तेव्हा त्यानी कोणताही विचार न करता केवळ दोन कारणांसाठी राजकारणात येण्याचा आणि पक्षाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. गार्गी फुले यांनी पक्षात प्रवेश करण्याबाबत बोलताना आपलं मत मांडलंय, त्या असं म्हणाल्या आहेत की, राष्ट्रवादीची विचारसरणी आणि तत्वे ही माझी स्वतःची आणि बाबांची होती.
पाहा का केला गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश (Gargi Phule Joined NCP)
या तत्वाला न्याय कोण देत असेल तर राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीसोबत काम करण्यास मला आनंद आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. राजकारणात तरुण पिढी येत नाही असं बोलतात मात्र प्रवाहात काम करायचे असेल तर उतरून काम करावे लागेल, असंही त्यांनी सांगितलं.(Gargi Phule Joined NCP)
हे देखील वाचा – लेक झालाय नम्रताचा मेकअप आर्टिस्ट, व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
यापुढे बोलताना त्या म्हणाल्या आहेत, मी किती सक्षम आहे हे पक्ष ठरवेल. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी योग्यरीत्या पाळेन. देशाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर राजकारणात येऊन काम करायला हवं असं गार्गी फुले यांनी म्हटलंय.