गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे, त्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये शाहरुखचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. धमाकेदार ऍक्शन सीन्स, डायलॉग्सने भरलेला हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होताच नेहमीप्रमाणे चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, शाहरुखच्या या लूकचे प्रचंड कौतुक होत असून चित्रपटाचा ट्रेलर जोरदार ट्रेंड होत आहे. (Jawan Trailer Out)
तीन मिनिटांचा या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या भूमिका समोर आली असून ज्यात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. तसेच, यात शाहरूखचे तब्बल पाच वेगवेगळे अवतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानाक ट्रेलरमधून जरी समोर आले नसले. तरी एकूणच वडील आणि मुलाच्या बदल्याची ही गोष्ट प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट आहे. शिवाय, या कथानकाला देशभक्तीची जोड मिळाल्यामुळे चित्रपटाला एक वेगळाच टच आला आहे.
अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, गिरीजा ओक व अन्य कलाकारही झळकणार आहे. त्याचबरोबर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये दिसणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलकही आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ७ सप्टेंबरला हा चित्रपट हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – “सहा लक्ष्मींच्या…” ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “नवं काम करताना मला…”
दरम्यान, युट्युबवर ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख आता बुर्ज खलिफावर रात्री ९ वाजता हा ट्रेलर लाँच करणार आहे.
याआधी त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शाहरुखचा हा चित्रपट ‘पठाण’ चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणार का? याकडे प्रेक्षक व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Jawan Trailer Out)