छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रचंड गाजलं. मात्र त्यातही एका पात्राला मुख्य अभिनेत्रीपेक्षाही जास्त लोकप्रियता मिळाली. ते पात्र म्हणजे शालिनी. शालिनी हे पात्र जरी खलनायिकेचं होतं तरी अभिनेत्री माधवी निमकर हिने ते पात्र इतकं छान पध्दतीने साकारलं की चाहत्यांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं. आपल्या खालनायिकेच्या भूमिकेनही तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. Madhavi Nimkar Fan Tattoo)
सोशल मीडियावर माधवी तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती तिच्या फिटनेसचे अपडेट्सही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. माधवीच्या या अनेक फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर माधवीचा चांगलाच चाहतावर्ग आहे. तिच्या अनेक चाहत्यांपैकी एका चाहतीने माधवीसाठी एक खास गोष्ट केली आहे आणि या चाहतीचा व्हिडीओ माधवीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – मोठी बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
माधवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या एका चाहतीने हातावर ‘माधवी’ असा टॅटू काढला आहे. यामुळे माधवी भारावून गेली असून तिने तिची आनंदी भावना व्यक्त केली आहे. या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “प्रिया काय बोलु मी? माझ्यासाठी हा अतिशय महत्वाचा क्षण आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर आणि माझ्यावर खूप प्रेम केलं आहेस”.
आणखी वाचा – “शहरात घर मिळवण्यासाठी…”, अभिनेत्याचं नवं घर पाहून भारावली ‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्री, म्हणाली, “खूप मेहनत…”
यापुढे माधवीने असं म्हटलं आहे की, “भेटायला येताना खूप भेटवस्तू आणतेस, दरवर्षी माझा वाढदिवसाला घरी केक पाठवतेस आणि आता तर माझा नावाचा कायमस्वरुपी टॅटू काढला आहेस. म्हणून तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्या या प्रेमाबद्दल तुला खूप खूप धन्यवाद”. दरम्यान, माधवीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत तूफान प्रतिसाद दिला आहे.