अभिनेता अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यापासून प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले होते. मात्र काही दिवसांनंतर अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आणि याचं कारण म्हणजे अक्षयने घेतलेलं नवं घर. अक्षयने मुंबईत स्वत:च घर घेतलं आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आहे. अक्षयने नवीन घर घेताच सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती आणि या पोस्टसह त्याने त्याच्या नवीन घराच्या भावना व्यक्त केल्या होत्या. (Sharmila Shinde on Akshay Kelkar New House)
“माझं पहिलं घर… ते ही मुंबईत. २०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच घर. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये रुम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो” असं म्हणत त्याने त्याच्या नवीन घराचा आनंद व्यक्त केला होता.
आणखी वाचा – मोठी बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
अक्षयच्या नवीन घरानिमित्त त्याला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच नवीन घरानिमित्त त्याचे कौतुकही केलं होतं. अशातच आता ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री शर्मिला शिंदेने नुकतीच अभिनेत्याच्या घरी गेली होती. त्याच्या घरातील एक खास फोटो शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तुझ्या घरातून हे शहर दिसते आणि या शहरात घर मिळवण्यासाठी तू खूप मेहनत केलीस मित्रा. मला तुझा खूप अभिमान आहे”.
शर्मिलाने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर या फोटोखाली अक्षयनेही कमेंट करत प्रेम असं म्हटलं आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शर्मिला सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दुर्गा या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर अक्षयची प्रमुख भूमिका असलेल्या अबीर गुलाल मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.