शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, मार्गशीषनिमित्त पूजाही केली, कलाकारांकडून कौतुक अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu shared her pooja photo with the news of new home marathi artists congratulated her

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, मार्गशीषनिमित्त पूजाही केली, कलाकारांकडून कौतुक अन्…

सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. नवीन घर घेणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण तारेवरची कसरत करत असतो. गेल्या वर्षात मराठीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या नावेन घर घेण्याची स्वप्नपूर्ती केली. अशातच नवीन वर्षाच्या प्रारंभीस आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. (Girija Prabhu On Instagram)

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील गौरी (आताची नित्या) अर्थात अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने २०२४ या नवीन वर्षात तिचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिने तिच्या नवीन घराबद्दलची माहिती दिली आहे. गिरिजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. गिरिजाने कलश व देवाची प्रतिमा असलेला एक फोटो व व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोमुळे गिरिजाने नवीन घर घेतले असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by @girijaprabhu_official

आणखी वाचा – “भूमिकेविषयी कळताच पियुष…”, लग्नानंतर मालिकेत काम करताना सुरुचीच्या नवऱ्याची प्रतिक्रिया काय होती?, म्हणाली, “आमच्यामध्ये…”

गिरिजाने शेअर केलेल्या या फोटोवर मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. मराठीतील सोनाली खरे, समृद्धी केळकर, भक्ती रत्नपारखी, माधवी नेमकर, अमेय बर्वे, मेघन जाधव व हर्षदा खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांनी तिला अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर गिरीजाच्या अनेक चाहते मंडळींनीही तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत व अभिनंदन म्हटले आहे.

आणखी वाचा – “देवबाप्पा जेवण बनवत आहे कारण…”, धुकं पाहून क्रांती रेडकरची लेक काय म्हणाली ऐका, अभिनेत्री म्हणते, “माझ्या भाच्याचं निधन…”

दरम्यान, ‘सुख म्हणजे काय असतं?’ या मालिकेने लिप घेतली असून आता या मालिकेची नवीन कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून यामधील गिरिजाचे ‘नित्या’ हे पात्रदेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.  

Tags: entertainment newsgirija prabhumarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi serialsukh mhnaje nkki kay ast
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
lady suggest to mitali mayekar wear bikini siddharth chandekar reply to troller see details

“बिकिनी घाल”, बायकोला विचित्र सल्ला देणाऱ्यावर भडकला सिद्धार्थ चांदेकर, म्हणाला, “तुमचे अहो घरी तुम्हाला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.