सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहणं कलाकार मंडळींना उत्तम जमतं. कलाकार विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत कलाकार चाहत्यांची वाहवाह मिळवतात. चाहतावर्ग वाढवण्यासाठी तसेच सतत सगळ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. मात्र यामध्ये कलाकार मंडळींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. ट्रोलिंग कोणत्याच कलाकाराला चुकलं नाही असं चित्र सध्या सोशल मीडियाचं आहे. मराठीमधील असंच एक जोडपं बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर चर्चेत असतं. ते म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर. मितालीच्या कपड्यांवरुन अनेकदा तिला सोशल मीडियावर सुनावलं जातं. आताही असंच काहीसं घडलं आहे. (Siddharth Chandekar On Instagram)
काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-मितालीने एकत्र जाहिरात केली. त्यादरम्यानचा व्हिडीओ दोघांनीही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोघांनीही वेस्टर्न कपडे परिधान केले असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने मितालीला विचित्र सल्ला दिला. नेटकऱ्याने कमेंट केली की, “बिकिनी घाल”. ही कमेंट वाचून सिद्धार्थचा राग अनावर झाला. त्याने या नेटकऱ्याला अगदी त्याच्या भाषेमध्ये सडेतोड उत्तर दिलं.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, मार्गशीषनिमित्त पूजाही केली, कलाकारांकडून कौतुक अन्…
मितालीला दिलेला विचित्र सल्ला सिद्धार्थला सहन झाला नाही. तो कमेंट करत म्हणाला, “तुमचे अहो तुम्हाला काय म्हणतात हे ताई इथे सांगू नका”. मितालीला सल्ला देणारी एक महिलाच होती. सिद्धार्थच्या या उत्तरानंतर तिने कमेंट करणं टाळलं. पण त्याने दिलेलं उत्तर चाहत्यांना मात्र आवडलं. कडक रिप्लाय, असंच उत्तर दिलं पाहिजे अशा अनेक कमेंट सिद्धार्थच्या या उत्तरावर चाहत्यांनी केल्या.

दरम्यान, मिताली जगभरात विविध टूर करत असते. जाहिरातीचं काम तसेच उत्तम पैसे कमावण्याची तिची ही कला आहे. यावरुनही मितालीला बोलण्यात आलं होतं. यावरही मितालहीसह सिद्धार्थने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. तसेच कपड्यांवरुन बोलणाऱ्यांनाही दोघंही वारंवार उत्तर देताना दिसतात. मितालीही एखाद्या विचित्र कमेंटला उत्तर देते. मात्र यावेली सिद्धार्थने त्याच्या स्टाइलमध्ये ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.