सध्या सर्वत्र चर्चा आहे ती केवळ बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची. एका स्त्रीच महत्व अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास भाग पाडतेय. या चित्रपटानिमित्त मराठी चित्रपट चालत नाही आहेत, मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही आहे या वाक्यांना कुठेतरी पूर्णविराम मिळाला आहे. पहिल्याच आठवड्यात करोडोंच्या पटीत कमाई करणारा हा या वर्षातील पहिला चित्रपट ठरला. अर्थात याचं सर्व श्रेय चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जातं. चित्रपटाचं जोरदार करण्यात आलेलं प्रमोशन, या प्रमोशनवेळीच कलाकार, दिग्दर्शकाची मिळालेली साथ याचा चित्रपटाच्या यशात अगदी खारीचा वाटा आहे.(Suchitra Bandekar Emotional)
सध्या बाईपण भारी देवा चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. अशातच या टीमने प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तो कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. दररोज सायंकाळीदार उघड बये दार उघड या टायटल सॉंगने मालिका पाहण्याची सुरुवात होणाऱ्या या कार्यक्रमावर चाहते आजही भरभरून प्रेम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून मानाची पैठणी कोण जिंकणार यासाठी अभिनेते आदेश बांदेकर म्हणजेच सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी जातं असतात. त्याच्या या कार्यक्रमात बाईपण भारी देवाची टीम उपस्थित होती.
पाहा का झाल्या सुचित्रा बांदेकर भावुक (Suchitra Bandekar Emotional)
यावेळी आदेश भावोजींनी या सगळ्या प्रवासात तुम्ही आता सगळ्यात जास्त कोणाला मिस करताय असा प्रश्न विचारला असता सुचित्रा या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. नुकताच झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून एक प्रोमो आउट करण्यात आला यांत सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर दोघंही भावुक झाले आहेत. सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, मी बाबांना मिस करेन, मी चांगलं काम करावं यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा. पैसे बघून काम करू नकोस, चांगलं काम कर असं त्यांचं म्हणणं असायचं. (Suchitra Bandekar Emotional)
हे देखील वाचा – स्पर्धेत येणाऱ्या अडचणींचा हिंमतीने सामना करणार आनंदी
जेव्हा मी बाळ कोल्हटकरांच्या देणाऱ्याचे हात हजारो मध्ये काम केलं किंवा कमलाकर सारंग काकांच्या रथचक्र सिरीयल मध्ये काम केलं तेव्हा ते खूप खुश होते. आणि आतासुद्धा ते माझी काम पाहत होते, काही वर्ष आधी गेले ते, पण त्यांनी मला चांगलं काम कर हे प्रत्येक वेळा ते सांगायचे. सो आता मला कधीकधी दादांची खूप आठवण येते. असं म्हणत सुचित्रा बांदेकर भावुक झाल्या. सोबत आदेश बांदेकरांचेही डोळे भरून आले.
