मालिका हे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा उत्तम साधन आहे.सध्या एकापेक्षा एक उत्तम कथानक आणि कलाकार असणाऱ्या मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. याच मालिकांसोबत अनेक नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ही जबाबदारी उत्तम पेलत आहेत.’मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेत्री दिव्या सुभाषने प्रेक्षकांचं मन जिंकलं. आणि थोड्याच कालावधीत दिव्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.आणि कमीच वेळात या मालिकेने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. आंनदी आणि सार्थकची जोडीला देखील प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे.(Man Dhaga New Promo)
मालिकेत सध्या सार्थकने आयोजित केलेल्या साडी स्पर्धेची धामधूम पाहायला मिळते आहे. यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. आनंदी रॅम्प वॉक साठी तयार होते.परंतु रेश्माला आनंदीने या स्पर्धेत भाग घ्यावा अशी इच्छा नाही आहे. आणि नेमकीचं रॅम्प वॉकच्या वेळेस आनंदीची चप्पल तुटते.तेव्हा शकू काळजीत पडते.
पाहा काय घडणार येत्या भागात? (Man Dhaga New Promo)
जी आनंदी रॅम्प वॉक साठी घाबरत होती, तीच आनंदी तेव्हा मात्र हिंमतीने उभी राहते, शकूला सांगते, स्पर्धा चप्पलची नाही साडीची आहे,जे नाही त्यावर रडण्यापेक्षा जे आहे त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय मी असं म्हणत अत्यंत आत्मविश्वासाने आनंदी रॅप वॉक करते. आनंदीचं हे नाव रूप मालिकेत काय नवीन रंजक वळण आणणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(Man Dhaga New Promo)
कालच्या भागात आपण पाहिलं आनंदी साडी घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचते, तेव्हा बेणारे तिला सांगतात कि तुम्ही बनवलेली साडी तुम्हालाच रेप्रेझेन्ट करायची आहे. हे ऐकून आनंदी काळजीत पडते, कारण तिच्या कडे कोणी मॉडेल नसते.तेव्हा रेश्मा आनंदीला स्वतःच साडी नेसून रॅम्प वॉक करण्याचं आव्हान देते, ते ऐकून आनंदी घाबरते, परंतु सार्थक तिला रॅम्प वॉक साठी प्रोत्साहन देतो.
हे देखील वाचा : अभिनेत्री प्रिया मराठेची ‘तुझेच मी गीत गात आहे ‘मालिकेतून एक्झिट दिसणार नव्या भूमिकेत