शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार, अफलातून ट्रेलर प्रदर्शित

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 6, 2023 | 6:10 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Aflatoon Movie Trailer

Aflatoon Movie Trailer

मंडळी सध्या सर्वत्र मराठी चित्रपटांचं वारं पाहायला मिळतंय अशातच आणखी एक धमाकेदार, तुफान विनोदी चित्रपट येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांसह अनेक दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध अशा “अफलातून” या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. (Aflatoon Movie Trailer)

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्या हाताळतात  याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत  दिमाखदार कार्यक्रमात प्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

(Aflatoon Movie Trailer)

‘अफलातून’ चित्रपटाची ‘अफलातून’ कथा

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.(Aflatoon Movie Trailer)

अफलातून चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए.फिल्म्सने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर,  शीला जगताप, अश्विन पद्मनाभन,  सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत.

 अफलातून २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: entertainmentits majja
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Johnny Lever and Jessey Lever

खऱ्या आयुष्यातही बाप लेकाची केमिस्ट्री रंगणार आता मोठ्या पडद्यावरही, जॉनी लिव्हर - जेसी लिव्हर 'अफलातून' चित्रपटातून येणार समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.