महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी व त्यांच्या शूर मावळ्यांनी अनेक पराक्रमे गाजवली आहे. त्यातील एक पराक्रम म्हणजे सिंहगड किल्ल्यावरील लढाई, आणि या लढाईचे मुख्य शिलेदार होते ते सुभेदार तान्हाजी मालुसरे. “आधी लगीन कोंढाण्याचं, आन मग माझ्या रायबाचं” असं म्हणणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ल्यावर चढाई करत शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंविरोधात लढले. याच सुभेदाराचा आणि त्यांचा अद्वितीय असा पराक्रमाचा इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. (Subhedar Movie)
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ लवकरच प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरूभरून प्रतिसाद मिळत आहे.
‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनानंतर चित्रपटातील कलाकारांनी नुकतीच किल्ले सिंहगडाला भेट देत सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी चित्रपटातील कलाकार चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र व अन्य कलाकार मंडळी उपस्थित होते. यानिमित्ताने चित्रपटात सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका करणारे अभिनेते अजय पुरकर यांनी किल्ले सिंहगडाची सफर घडवून दिली. त्यांचा सिंहगडाची सफर घडवतानाचा व्हिडिओ नुकतंच समोर आला आहे. ज्यात ते किल्ल्यांमधील विविध ठिकाणांची ओळख करून देत काही रंजक किस्से सांगत आहे. (Team Subhedar Movie visit Fort Sinhagad)
हे देखील वाचा – Subhedar Trailer : “आधी लगीन कोंढाण्याचं..” सुभेदार चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित
हे देखील वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटातलं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ! आता ‘या’ तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित
सिंहगडावरील काही रंजक किस्से सांगताना अजय पुरकर म्हणतात, “माझ्या वडिलांच्या पुस्तकात कुठेतरी या किल्ल्याचा उल्लेख आला होता, मात्र ते मी विसरलो. पण एकदाचा इतिहास मुरला की ते कसं होतं, ते माहिती आहे. साधारण संध्याकाळी पाच-साडेपाचची वेळ होती, पावसाळ्याचे दिवस नव्हते. पण किल्ल्यातून खाली उतरत असताना ते जेव्हा दरवाज्यातून बाहेर पडले. तेव्हा त्यांना तिथे कोणीतरी उभा असल्याचे वाटलं. आणि मागे वळून पाहिले, तर तेव्हा त्या दरवाजाच्या भिंतीला हात ठेवून एक मावळा दरीत उभा राहून खाली बघायचे, असं त्यांनी लिहून ठेवले आहे.”
हे देखील वाचा – “आधी लगीन कोंढाण्याचं…” ‘सुभेदार’ चित्रपटातील ऐतिहासिक क्षणाचं खास पोस्टर प्रदर्शित
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. (Subhedar Movie)